शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी विद्यार्थी बससेवा बंद :तळोदा-अमोनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 15:15 IST

तळोदा-अमोनी : शैक्षणिक नुकसान; खाजगी वाहनांचा आधार; प्रशासनाचे दुर्लक्ष

तळोदा : तळोदा-अमोनी ही विस्थापितांसाठी सुरू केलेली बस अरुंद रस्त्याचे कारण दाखवत गेल्या महिनाभरापासून बंद करण्यात             आली आहे. त्यामुळे शालेय विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या विस्थापितांनाही खाजग वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता आता चांगला झाला आहे. तसेच या बसचा मार्ग बदलून तो तळोदा ते कालीबेल       असा करून ही बसफेरी तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या विस्थापित गावांसाठी अक्कलकुवा आगाराने तळोदा-अमोनी ही बस सेवा गेल्या अनेक वर्षापासून सुरू केली होती. साहजिकच या बसमधून साधारण 150 शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तळोद्याला येण्यासाठी प्रवास करीत असतात. त्याच बरोबर तेथील नागरीकही या बसमध्येच बाजारहाट व इतर कार्यालयीन कामकाजासाठी तळोद्याला येत असतात. परंतु अरूंद रस्त्याचे किरकोळ कारण दाखवत संबंधित आगार प्रमुखाने गेल्या महिनाभरापासून ही बससेवा बंद केली आहे. त्यामुळे अमोनी, रेवानगर, नर्मदानगर, सरदारनगर, राजविहीर आदी ठिकाणाहून तळोद्याला शालेय व महाविद्यालयात शिकायला येणा:या 150 विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांना नाईलाजास्तव खाजगी वाहनातून महागडा प्रवास करावा लागत आहे. या उपरांतरही वाहनधारक गाडीमध्ये प्रवाशांना कोंबडय़ासारखे कोंबून आणत असल्यामुळे नाईलाजास्तव धोकादायक प्रवास करावा लागत असल्याची विद्याथ्र्याची व्यथा आहे.वास्तविक या मार्गाची डागडूजी झाली आहे. शिवाय रस्ता अरूददेखील झाला आहे. त्यामुळे सहन बस जावू शकते, अशी वस्तुस्थिती असतांना अजूनपावेतो संबंधित विभागाने ही बससेवा सुरू करण्याबाबत उदासिन धोरण घेतले आहे. रस्त्याच्या स्थितीची चौकशी करून बस सुरू करावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या बसचा सद्याचा मार्ग बदलून तो तळोदा, दलेलपूर, रेवानगर, रानमहू, अमोनी, कालीबेल असा करावा. कारण हा मार्ग प्रवाशांना उलटा पडतो. रेवानगरकडे येण्यासाठी 20 किलोमीटर फिरून यावे लागते. शिवाय अतिरिक्त भाडेदेखील             द्यावे लागत असते. साहजिकच प्रवाशांनाही नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागतोच. त्यात वेळही            वाया जात असतो. त्यामुळे या           मार्गाने ही बससेवा तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य नाथा पावरा,          उपसरपंच दाज्या पावरा, इंदास पावरा, अनिल पावरा सचिन पावरा, लेह:या पावरा, दिगंबर पावरा यांनी केली आहे. दरम्यान तळोदा येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक जयसिंग वळवी यांनी निवेदन स्विकारून सदर बस फेरी सुरू करण्यासाठी अक्कलकुवा आगारप्रमुखांकडे ताबडतोब पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.