नंदुरबार : शहादा तालुक्यातील कलमाडी येथे किरकोळ वादातून एकास मारहाण करत त्याचा हात मोडल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली़कलमाडी येथील रविंद्र उरश्या पवार हा शेतीकामासाठी मजूर गोळा करत असल्याची माहिती मोन्या जंगू ठाकरे याला मिळाली़ त्याने रविंद्र याच्या घरी जाऊन वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली़ दरम्यान मोन्यासह वनश्या जंगू ठाकरे व जंगू मंगू ठाकरे यांनीही रविंद्र यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यात लोखंडी गजाने हातावर मार बसल्याने रविंद्र यांचा हात मोडला़ याबाबत रविंद्र पवार यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गौतम बोराळे करत आहेत़ यातील संशयित मोन्या ठाकरे हा मुकादम असल्याने त्याचा मजूर गोळा करण्यास विरोध होता़
किरकोळ वादातून कलमाडी येथे मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 15:30 IST