शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चरणमाळ घाटात कर्मचाऱ्यांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:18 IST

तिघे संशयीत : सव्वा दोन लाख घेवून पसार

नंदुरबार : नवापूर येथून चरणमाळ ता़ साक्री येथे दूध उत्पादक संघाचे पैसे घेऊन जाणाऱ्या दोघांना अडवून त्यांना लुटल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली़ दुचाकीने आलेल्या लुटारुंनी सव्वादोन लाख रुपये लुटून नेले असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.चरणमाळ ता़ साक्री येथील गुलाब छगन मावची व रेशमा जान्या मावची हे चरणमाळ दूध संघाची वसुली करुन एमएच १८ एएल ६५२४ या दुचाकीने मंगळवारी दुपारी रायंगणपाडा ता़ नवापूर येथून चरणमाळकडे जाण्यासाठी निघाले होते़ दरम्यान चरणमाळ घाटातून जात असताना अचानक मागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला़गुलाब मावची यांना शंका आल्याने त्यांनी दुचाकी पुढे नेण्याचा प्रयत्न केला परंतू तिघांनी दुचाकी थांबवत मावची यांच्याकडील २ लाख २७ हजार ५०० रुपये असलेली पैशांची बॅग हिसकावून घेतली़ यादरम्यान झालेल्या झटापटीत गुलाब मावची व रेशमा मावची या दोघांनाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली़ तिघेही नवापूूरकडे निघून गेल्याची माहिती आहे़ दोघांना जखमी अवस्थेत नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर गुलाब मावची यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तींविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील करत आहेत़दोघा जखमींची उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी भेट घेत माहिती जाणून घेतली़ दरम्यान, याच घाटात आठ महिन्यांपूर्वी हवाला मार्गाची मोठी रक्कम लुटण्यात आली होती. त्यामुळे या घाटात पोलीस चौकी तयार करावी व पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.