शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक व्यवस्थेवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:27 IST

ट्रॅव्हल्सचीही मनमानी : रेल्वे हाऊसफुल्ल तर एसटीच्या दरवाढीने प्रवासी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐन सणासुदीच्या दिवसांमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नंदुरबार येथील खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून आता आडमुठीपणाची भूमिका घ्यायला सुरुवात झाली आह़े दिवाळीच्या दरम्यान भाडय़ात वाढ करुन प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करण्यात येत आह़े यामुळे इतर वाहतूक व्यवस्थेवरही ताण आला आह़ेदिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली आह़े त्यामुळे मोठय़ा संख्येने प्रवासी या दिवसांमध्ये ये-जा करीत असतात़ त्यामुळे साहजिकच दळणवळण व्यवस्थेवर मोठा बोजा पडताना दिसून येत आह़े त्यामुळे या दिवसांमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाडेवाढ करण्यात आली आह़े नंदुरबारातून पुणे, नाशिक व मुंबई या मार्गावर सर्वाधिक वाहतूक करण्यात येत असत़े त्यामुळे ऐरवी पाचशे ते सहाशे रुपये असलेले भाडे आता वाढवून बाराशे ते पंधराशे करण्यात आले आह़े त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना प्रवासासाठी मोठय़ा प्रमाणात खिसे खाली करावे लागत असल्याचे म्हटले जात आह़े दिवाळीनिमित्त वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण जाणवत आह़े आधीच  रेल्वे हाऊसफूल्ल आहेत तर एसटीनेही नुकतीच हंगामी भाडेवाढ केली आह़े त्यातच खाजगी ट्रॅव्हल्सकडूनही आता जास्तीचे भाडे आकारण्यात येत असल्याने प्रवासी कोंडीत सापडत असल्याचे चित्र दिसून येत आह़े त्यामुळे ग्राहकांना पर्याय नसल्याने नाईलाजाने एसटी तसेच खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आह़े प्रवासासाठी रेल्वे उत्तम माध्यम मानले जात असले तरी यात होणारी गर्दी प्रचंड आह़े त्याच रेल्वे प्रशासनाकडून दिवाळीनिमित्त कुठलीही जादा गाडीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने परिणामी आहे त्या रेल्वे गाडय़ांवरच अधिक भर पडत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांचे चांगलेच हाल होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आह़े खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून दिवाळीनिमित्त सोडण्यात येणा:या ट्रॅव्हल्सची बुकींग  करुन देण्यात येत आह़े यात, दुप्पट भाडेवाढ करण्यात आली आह़े नंदुरबारातून नाशिकसाठी फार कमी ट्रॅव्हल्स जात असतात़ त्यामुळे याचाही  फायदा घेऊन कंपन्यांकडून प्रवाशांची अडवणूक करण्यात येत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आल़े