शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शनिमांडळ येथे पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : तालुक्यातील शनिमांडळ येथील बसस्थानकालगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : तालुक्यातील शनिमांडळ येथील बसस्थानकालगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते़ घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़शनिमांडळ गावात शनिमंदीर चौकात बसस्टँड लगत विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत़ याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसह मंदिर तयार करण्यात आले आहे़ सोमवारी रात्र ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मूर्तीची विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला होता़ सकाळी शनिमंदिरात दर्शनासाठी गेलेल्यांना हा प्रकार समजून आल्यानंतर त्यांनी गावात याची माहिती दिली होती़ पहाटे दोन ते तीन वाजेदरम्यान हा प्रकार झाला असावा असा अंदाज आहे़ अत्यंत गंभीर अशा या प्रकारानंतर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पाटील हे तातडीने हजर झाले होते़ त्यांच्या उपस्थितीत श्वानपथक बोलावण्यात येवून परिसरात चाचपणी करण्यात आली़ ग्रामस्थांनी येथे गर्दी करुन पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास तातडीने अटक करण्याची मागणी केली होती़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी ग्रामस्थांची समजूत काढली होती़दरम्यान विटंबना झालेल्या मूर्तीचे पोलीस अधिकाऱ्यांनी विधीवत पूजन करुन शिवालयातून काढून घेत नंदुरबारकडे रवाना केली आहे़ गावात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शनिमंदीर चौक परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़दरम्यान या प्रकरणी प्रविण वसंत पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात समाजकंटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे़ मंगळवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून तातडीने या प्रकाराची चौकशी सुरु झाली होती़ पोलीस निरीक्षक ए़व्ही़पाटील घटनेचा तपास करत आहेत़