शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

91 कोटी लीटरने वाढणार साठवण क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 11:59 IST

जलसंधारणाची कामे : 40 गावांमध्ये लोकसहभागातून चळवळ

नंदुरबार : शहादा आणि नंदुरबार तालुक्यात लोकसहभागातून 40 गावांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे जिल्ह्यातील पाणी साठवण क्षमता ही 91 कोटी 34 लाख लीटरने वाढणार असल्याचा दावा भारतीय जैन संघटनेने केला आह़े  गेल्या महिनाभरापासून शहादा 36 तर नंदुरबार तालुक्यातील 48 गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले होत़े यापैकी नंदुरबार 19 व शहादा तालुक्यातील 22 गावांनी लोकसहभागातून सिसीटी, कंपार्टमेंट, बंडींग, गावतलाव खोलीकरण आदी कामे पूर्ण केली होती़ या लोकसहभागाला मदतीची लोड देत भारतीय जैन संघटनेच्यावतीने 4 हजार 671 तास पोकलँड व 7 हजार 753 तास जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यात आले होत़े 9 एप्रिल ते 22 मे या दरम्यान झालेल्या कामांमुळे साठवण क्षमता वाढून तेवढाच गाळ काढण्यात आला आह़े या कामांचे मूल्यमापन येत्या काळात होणार असून यातील काही गावे ही स्पर्धात्मक यशात पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यासंदर्भात बिजेएसचे अध्यक्ष डॉ़ कांतीलाल टाटिया यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली़ ते म्हणाले की, विविध गावांमध्ये गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या या कामांसाठी बीजेएसच्या 1 हजार कार्यकत्र्यानी परिश्रम घेतल़े नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी इंधनासाठी लोकसहभाग देणा:या गावांना दीड लाख रूपये उपलब्ध करून दिल्याने जनसंधारणाच्या कामांना अधिक वेग आला होता़ येत्या काळात पाऊस आल्यानंतर या कामांची क्षमता स्पष्ट होणार असली तरी मूल्यमापनानुसार या कामांना यश आल्याचे सांगण्यात येत आह़े शहादा तालुक्यातील नवानगर, मंदाणे, भुलाणे, भोंगरा, लंगडी, मानमोडय़ा, काकर्दे, सोनवद, कौठळ, मोहिदे तर्फे शहादा, गोगापूर, डामळदा, निंभोरा, धांद्रे बुद्रुक, बोराडे, दुधखेडा, अनरद, शोभानगर, वाडी पुनर्वसन,बामखेडा तर्फे हवेली, खेड दिगर आणि वडगाव या गावांमध्ये वॉटर कपअंतर्गत विविध कामे झाल्याचे डॉ़ कांतीलाल टाटिया यांनी सांगितल़े   नंदुरबार तालुक्यातील न्याहली, दहींदुले बुद्रुक, ठाणेपाडा, आसाणे, भादवड, धमडाई, काकरदे, दुधाळे, वाघाडी, शिरवाडे, वडझाकण, उमर्दे खुर्द, पळाशी, शिंदे, पाचोराबारी आणि अजेपूर या गावांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढून कामे पूर्ण झाली होती़यासोबतच जिल्हाधिकारी यांनी पथराई, खोडसगाव, समशेरपूर, वावद, उमर्दे बुद्रुक, लहान शहादे, टाकली पाडा, कं्रढे ता़ नंदुरबार, अलखेड, शहाणा, काथर्दे खुर्द, पुसनद ता़ शहादा, सिंगसपूर, तळवे, तळोदा पालिका ता़ तळोदा तसेच मुंगबारी याठिकाणी जलसंधारणाची कामे सुचवली होती़ याठिकाणीही खोदकामासाठी जैन संघटनेकडून जेसीबी आणि पोकलँड मशीन उपलब्ध करून देण्यात आले होत़े