शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांची पळवा-पळवी थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 15:05 IST

महाव्यवस्थापकांचे आदेश : बसस्थानकाच्या 200 मीटर परिसरात वाहनांना मनाई

नंदुरबार : बसस्थानकांच्या 200 मीटरच्या परिसरातील ‘नो पार्किग झोन’मध्ये लावण्यात येत असलेल्या खाजगी प्रवासी वाहने तसेच इतर वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्याकडून देण्यात आले आह़े खाजगी वाहनधारकांच्या वाढत्या मुजोरीमुळे एसटी चालक व वाहकांना मोठय़ा प्रमाणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत़बसस्थानकाच्या 200 मीटरच्या परिसरात खाजगी प्रवासी तसेच अन्य खाजगी वाहनांची पार्किग करण्यास मनाई आह़े ही नियमावली जुनीच असली तरी आता या पुढे याची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना महाव्यवस्थापकांकडून सर्व आगारप्रमुखांना देण्यात आल्या आहेत़ अनेक वेळा खाजगी वाहनधारकांच्या एजंटकडून बसस्थानकांवर दिवसभर ठिय्या मांडण्यात येत असतो़ तसेच बसस्थानकावरील प्रवाशांकडे आपल्या वाहनातूनच प्रवास करण्यासाठी तगादा लावण्यात येत असतो़ यामुळे अनेक वेळा प्रवासीदेखील त्रस्त होत असतात़ खाजगी एजंटकडून अशा प्रकारे प्रवाशांची पळवा-पळवी करण्यात येत असत़े त्यामुळे संबंधित आगाराच्या भारमानावर याचा परिणाम होत असून एसटीचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत असत़े खाजगी प्रवासी वाहनधारकांची गेल्या काही दिवसांपासून दादागिरी वाढली आह़े नंदुरबार आगारात सर्रासपणे आपली वाहने उभी करुन प्रवाशांना आपल्याकडे वळवण्यात येत असत़े अनेक वेळा प्रवाशांची इच्छा नसतानाही एजंटकडून लावण्यात येत असलेल्या तगाद्यामुळे त्यांना अखेर खाजगी वाहनांमधूनच प्रवास करावा लागत असतो़ नंदुरबार बसस्थानकाच्या आत व बाहेर जाण्याच्या मार्गामध्येच खाजगी वाहनधारकांकडून आपली वाहने लावण्यात येत असतात़ त्यामुळे अनेक वेळा एसटी बसच्या चालक तसेच वाहकांना बसेस् आत आणतांना मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असतो़ यातून अनेक वेळा अपघातदेखील होत असतात़ त्यामुळे चालक व वाहकांकडून         अनेक वेळा याबाबत आगार प्रशासनकडे तक्रारीदेखील करण्यात आल्या  आहेत़