शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मान्सूनचे मागील पावलांवर पाऊल

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: July 13, 2018 11:55 IST

आतार्पयतची वाटचाल : मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात तुरळक, ‘लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज’ समान

ठळक मुद्दे‘लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज’ समानमराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचीच शक्यतामागील वर्षी दक्षिण-पश्चिम मान्सून 6 दिवस आधीकोकणसह परिसरात काही ठिकाणी मुसळधार

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या तीन वर्षातील सक्रीय मान्सूनची वाटचाल बघता यात बरेच साम्य दिसून येत आह़े केवळ कमी दाबाच्या पट्टय़ांचे क्षेत्र वगळता मान्सूनचे यंदाचेही मार्गक्रमण एकसारखेच असून त्याने मागील पावलांवर पाऊल टाकले असल्याचेच  यातून दिसून येत आह़ेगेल्या तीन वर्षात मान्सूनची वाटचाल तारखांच्या तुलनेत केवळ एक ते दोन दिवसांच्या फरकाने झाली असल्याचे दिसून येत आह़े भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2016 मध्ये मान्सून 31 मे रोजी केरळात दाखल झाला होता़ 9 जूनमध्ये तो महाराष्ट्रात दाखल झाला होता व 11 जूनर्पयत त्याने संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होत, त्यानंतर 18 जूनर्पयत त्याने संपूर्ण देश व्यापला होता़ 2017 साली एक  दिवस आधी म्हणजे 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता़ 10 जूनला तो महाराष्ट्रात दाखल होऊन 24 जूनर्पयत तो संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय झाला होता़ 19 जूलैला तो संपूर्ण देशात सक्रीय झाला होता़ यंदा 2018 मध्ये 29 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता़ 8 जून रोजी तो महाराष्ट्रात दाखल झाला व 24 जूनर्पयत त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता़ त्याच प्रमाणे 29 जूनर्पयत मान्सून संपूर्ण देशात सक्रीय झाला होता़ 2017 सालीसुध्दा 24 जून रोजी त्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापले होत़े 2016 ते 2018 र्पयतची मान्सूनची वाटचाल एक ते दोन दिवसांच्या फरकाने जवळपास सारखीच होत असल्याचे या आकडेवारीतून दिसून येत आह़े मान्सूनच्या वाटचालीत सातत्य असल्याने हवामान खात्याकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आह़ेमागील वर्षी दक्षिण-पश्चिम मान्सून 6 दिवस आधी2017 सालच्या मान्सूनची वाटचाल बघितली असता, दक्षिण-पश्चिम मान्सून मागील वर्षी 14 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला होता़ सामान्य वेळेपेक्षा तब्बल 6 दिवस आधीच हा मान्सून पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकला होता़ 19 जुलैर्पयत तो संपूर्ण देशात सक्रीय झाला होता़ हा कालावधी सामान्य वेळेच्या 4 दिवस उशिरा होता़ त्याच प्रमाणे 2018 च्या मान्सूनचीसुध्दा वाटचाल काही दिवसांच्या फरकाने सारखीच राहिलेली आह़े ‘लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज’ समान2017 मध्ये महाराष्ट्राचा सरासरी एलपीए (लॉन्ग पिरीयड अॅव्हरेज) 102  टक्के इतका नोंदविण्यात आला होता़ महिना निहाय त्याची टक्केवारी जून 104 टक्के, जुलै 102 टक्के, ऑगस्ट 87 टक्के, सप्टेंबर 88 टक्के अशी राहिली होती़ 2018 मधील जून महिन्याचा एलपीए पाहिला असता त्याची टक्केवारी 105 असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े म्हणजे एलपीएच्या बाबतीतही साधारणत दोन्ही वर्षांमधील सुरुवात सारखीच झाली असल्याचे चित्र तृत दिसून येत आह़े मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचीच शक्यताभारतीय हवामान विभागाकडून वर्तविलेल्या अंदाजानुसार 13 ते 15 जुलै दरम्यान, कोकणसह परिसरात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याच शक्यता आह़े मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आह़े तसेच विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची अंदाज व्यक्त होत आह़े त्यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मध्यम पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आल़े2017 मध्ये एकूण 14 लो प्रेशर सिस्टीमची निर्मिती झाली होती़ त्यात, 1 डीप डिप्रेशन, 2 डिप्रेशन्स, 6 वेल मार्क लो प्रेशर एरिया व 5 लो प्रेशर एरियाचा समावेश होता़ त्यातुलनेत 2018 मध्ये अद्याप 4 क्षेत्रांवर लो प्रेशर एरिया (कमी दाबाचे क्षेत्र) निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाच्या अहवालात नमूद आह़े सर्वाधिक कमी दाबाचे क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात निर्माण झाले आह़े त्यामुळे विदर्भ व कोकण परिसरात मोठय़ा प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आह़े