नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथून एक लाख रुपये किमतीचे दोन पांढरे बैल व दोन धांडे चोरुन नेल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली़ याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बैल चोरीप्रकरणी संशयित आरोपी प्रकाश छगन पाटील रा़ आसाने ता़ नंदुरबार व संजय तुकाराम पाटील रा़ वरखेडा ता़ पाचोरा जि़ जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सलग दुसºया दिवशी बैलजोडीची चोरी झाल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे़ कालच अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही येथून दोन बैलाची चोरी करण्यात आली होती़ दरम्यान, माणिक महिपत पाटील (४४) रा़ आसाने ता़ नंदुरबार यांच्या फिर्यादीवरुन वरील दोन आरोपीविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास हवालदार असई सोनवणे हे करीत आहेत़
सलग दुसऱ्या दिवशी बैलजोडी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:25 IST