शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा फज्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 12:21 IST

साडेतीनशे कोटी खर्चाचे रस्ते ठप्प : दिवाळीपूर्वी गुळगुळीत रस्ते करण्याचे स्वप्न अधुरेच राहणार

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करुन नवीन रस्ते तयार करण्यासाठी राज्या शासनाने दोन वर्षापूर्वी हाती घेतलेली महत्वाकांक्षी रस्ते योजनेचा नियोजनाअभावी फज्जा उडाला आहे़ याच योजनेत नंदुरबार जिल्ह्यातील सुमारे ३६४ कोटी रुपये खर्च असलेल्या १३८ किलोमीटर लांबीचे रस्ते हाती घेतले असले तरी, निधी व सरकारच्या नियोजनाअभावी ही कामे नावालाच सुरु झाली आहेत़ त्यामुळे दिवाळीपूर्वी पूर्ण होणारी ही कामे अर्धवटच रखडण्याची चिन्हे आहेत़राज्यात सुमारे १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते १० मीटर रुंदीचे करण्याची महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने हाती घेतली होती़ या योजनेंतर्गत ६० टक्के निधी राज्य शासन व ४० टक्के निधी संबंधित ठेकेदाराने बँकांकडून कर्ज घेऊन उभारायचा आहे़ हा ४० टक्के निधी सरकार संबंधित ठेकेदाराला १० वर्षात २० टप्प्यात देण्याचे नियोजन आहे़ ही कामे दोन वर्षात पूर्ण करावयाची होती़मात्र या संदर्भात निविदा प्रक्रियेतच विलंब झाला़ निविदा निश्चित झाल्यानंतर ठेकेदारांनी कामे तर सुरु केली पण, पुढे योजनेतील निकषामुळे अनेक अडचणी आल्यामुळे जवळपास आठ महिन्यांपासून बहुतांश कामे प्राथमिक अवस्थेतच आहेत़नंदुरबार जिल्ह्यातील चित्र पाहिल्यास या योजनेंतर्गत राज्यमार्ग क्ऱ ११ वरील सुजालपूर-समशेरपूर-करणखेडा ते ठेकवद तसेच आमलाड-मोड-बोरद-शहादा-असलोद असे एकूण ८६.२५ किलोमीटर रस्त्याचे व सुमारे २३९ कोटी ७० लाख खर्चाचा रस्ता आणि राज्यमार्ग क्ऱ५ वरील केदारेश्वर मंदिर-प्रकाशा-वैजाली-काथर्दा-कलसाडी-म्हसावद आणि राज्यमार्ग क्ऱ ३ वरील मोलगी-डाब-अक्कलकुवा असा एकूण ५२.५ किलोमीटर लांबीचे व १२४ कोटी ९१ लाख रुपये खर्चाचे रस्ते हाती घेण्यात आले होते़ या रस्त्यांची कामे हैदराबाद येथील आऱआऱ कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे़साधारणत: २१ जून २०१८ ला करार झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे़ मात्र या रस्त्यावरच काम करणाऱ्या वाहतूकदारांचे बिले थकल्याने सध्या हे रस्ते वादातील ठरले आहेत़ रस्त्यांची कामेही अर्धवटच राहिली आहे़ काही कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे प्रयत्न होते़ तथापि, अडचणींमुळे कामे अतिशय संथगतीने सुरु आहेत़ प्राप्त माहितीनुसार संबंधित ठेकेदार कंपनीला कर्ज देण्यासाठी बँका पुढे येत नसल्याने उर्वरीत ४० टक्के निधी देणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे़ निधीचा प्रश्न तसेच करारातील तांत्रिक तृटींमुळे कामावर परिणाम होत असून योजना वेळेत पूर्ण करण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहणार आहे़