नंदुरबार : अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन आठ वर्षे पूर्ण होत आहेत. तरी खुनामागील खरे सूत्रधार कोण ? याचा तपास करण्यात शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. खुनामागील सूत्रधाराला तत्काळ अटक करावी या मागणीसाठी जिल्ह्यात महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले.
नंदुरबार शाखेच्या वतीने शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तपासात होणाऱ्या दिरंगाई बाबत महा. अंनिसच्या शाखेकडून निषेध सत्याग्रह करण्यात आला व डॉ. दाभोलकरांना आदरांजली वाहण्यात आली. प्रसंगी शाखेचे सूर्यकांत आगळे, वसंत वळवी, मीनाक्षी आगळे, बलदेव वसईकर, अनंत सूर्यवंशी, विजय अहिरे, दीपक चौधरी व किर्तीवर्धन तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
तळोदा तहसीलदारांना निवेदन
अंनिसच्या तोडगा शाखेच्या वतीने तहसीलदार गिरीश वखारे यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष डॉक्टर देविदास शेंडे, बुवाबाजी संघर्ष विभागाचे प्रा डॉ प्रशांत बोबडे,तळोदा शाखेचे कार्याध्यक्ष मुकेश कापुरे, जयश्री महाले, अमोल पाटोळे, आदींच्या निवेदनावर सह्या होत्या.
शहादा येथे तहसीलदारांना निवेदन
शहादा अंनिसच्या शाखेने देखील तहसीलदारांना होणार सूत्रधारांना अद्याप अटक न झाल्याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा आणि त्याचे अध्यक्ष हैदरअली राणी माजी उपाध्यक्ष शशांक कुलकर्णी,साहित्यिक डॉ अलका कुलकर्णी,वनिता पटले,चुनीलाल ब्राह्मणे,राज्य सरचिटणीस विनायक साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील,संतोष महाजन, प्रवीण महिरे आदी उपस्थित होते.
जिल्हाभरात एकाच दिवशी हे निवेदन देत सूत्रधारांना तत्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली.