शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात राज्यस्तरीय वारकरी संमेलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 11:12 IST

उद्घाटन : भक्तीतच शक्ती सामावलेली-खासदार हीना गावीत

नंदुरबार : नंदुरबार- भजन कीर्तनातून संस्कार घडत असतात. भक्तीतच सर्वात मोठी शक्ती सामावलेली असून, वारकरी संप्रदायातून समानता व समाज एकात्मतेचे दर्शन घडत असते असे प्रतिपादन खा.डॉ. हिना गावित यांनी केले. राज्यस्तरीय वारकरी संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली.शुक्रवार, 21 डिसेंबर पासून नंदुरबारात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हा कमिटीच्या वतीने माळीवाडा परिसरात राज्यस्तरीय वारकरी संमेलन तथा भव्य कीर्तन महोत्सव व ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन खासदार गावीत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रास्ताविक वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज माळी यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, भाजप ओबीसी मोचार्चे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, उद्योगपती मनोज रघुवंशी, यशोदाबाई जायखेडकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे, नगरसेवक आनंदा माळी, भिला खोरी महाराज, अनिल महाराज वाळवे, किशोर महाराज प्रकाशेकर, विजय महाराज जाधव, छोटू महाराज, डॉ.तुषार सनसे, कृषिभूषण पाटीलभाऊ माळी, चारुदत्त कळवणकर, गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव, विजय माळी आदी उपस्थित होतेखासदार डॉ. गावित म्हणाल्या, चांगले जीवन जगण्याची दिशा संतांच्या विचारांतून होत असते. समाजात आज ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहेत त्या संतांच्या विचार प्रेरणेमुळेच घडत आहेत. वारकरी संमेलन जिल्ह्यासाठी पर्वणी ठरणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले, संमेलनातून राष्ट्र घडत असते. या संमेलनात व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी संयोजकांना केले. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले म्हणाले, अधिकारी, वारकरी व पुढारी ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळी राष्ट्राचा ख:या अर्थाने विकास व्हायला वेळ लागणार नाही. वारकरी आता भावनाहीन राहिलेला नसून तो सर्वत्र सामावलेला असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनात मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित     होते.