शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

पतंगोत्सवातही भरला राजकीय रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 21:09 IST

नंदुरबार : मकर संक्रांत अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपली आह़े यंदाचे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने याचे पडसाद येथील पतंगोत्सवावरही पडताना ...

नंदुरबार : मकर संक्रांत अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपली आह़े यंदाचे वर्ष निवडणुकीचे वर्ष असल्याने याचे पडसाद येथील पतंगोत्सवावरही पडताना दिसून येत आह़े विविध राजकीय नेत्यांची छबी तसेच आव्हान प्रतिआव्हान देणारे वाक्य पतंगीवर प्रिंट करण्यात आली आहेत़ त्यामुळे साहजिकच पतंगोत्सवात यंदा राजकीय रंग भरला जात असल्याचे बोलले जात आह़े या वर्षी लोकसभा निवडणूक पार पडणार आहेत़ त्यामुळे विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सर्वच माध्यमातून आपला पक्ष, पक्षाचे नेते आदींचा प्रचार करताना दिसून येत आह़े लोकसभा निवडणुकींना अवघ्या पाच महिन्यांचा काळ उरला असल्याने सर्वच राजकीय नेते तसेच पदाधिकारी आता कामाला लागले आहेत़ जाहिरात, प्रसिध्दी हे निवडणुका जिंकण्याचे प्रभावी साधन म्हणून त्याचा वापर केला जाऊ लागला आह़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारातील पतंगोत्सवातही याचे प्रतिबिंब उमटतांना दिसून येत आह़े किसमे कितना है दमपतंग व्यापा:यांकडून नेहमीच देशातील चालू घडामोडींचा आढावा घेण्यात येत असतो़ व त्या पध्दतीने प्लॅस्टिक पतंगीवर वेगवेगळया छबी तयार करुन त्यांची विक्री करण्यात येत आह़े यंदाचे वर्ष लोकसभा निवडणुकांचे असल्याने राजकीय वतरुळात चर्चेचा चेहरा असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या छबी असलेल्या पतंगला अधिक मागणी वाढली आह़े गांधी व मोदी यांची छबी असलेल्या पतंगीवर ‘किसमे कितना है दम’ असे वाक्य लिहण्यात आले आह़े त्यामुळे या पतंगीकडे ग्राहक अधिक आकर्षित होताना दिसून येत आहेत़ त्याच प्रमाणे विविध राजकीय नेत्यांची छबी असलेल्या पतंगही कार्यकत्र्याकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी करण्यात येत आहेत़ यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मै हू विकास’ या पतंगीचीही मोठय़ा प्रमाणात चर्चा आह़े दरम्यान, मागील वर्षी उद्घाटीत झालेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, बेटी बचाओ देश बचाओ, झालर पतंग, प्लॅस्टिक मेटल पतंग, सप्तरंगी पतंग आदी विविध प्रकारच्या पतंगला ग्राहकांकडून अधिक मागणी आह़े त्याच प्रमाणे मांजामध्येही साखळ 8, पांडा गोल्ड, बरेली मांजा आदी प्रकारच्या मांजाला अधिक मागणी आह़े त्यातच साखळ 8 या प्रकारच्या मांजाला विशेष मागणी असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, 10 रुपयांमध्ये 5 पतंगपासून तर, 700 रुपयांना 5 पतंगर्पयत विविध प्रकारांमध्ये पतंग उपलब्ध आहेत़ दरवर्षी पेक्षा यंदा पतंग व मांजाचा व्यवसाय जोरात असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़ेलाखोंची उलाढालमकर संक्रांतीनिमित्त गुजरात राज्यात मोठय़ा प्रमाणात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असत़े नंदुरबार जिल्हा लागूनच असल्याने साहजिकच तेथील सांस्कृतिक, सामाजिक परंपरांचे                   बिंब नंदुरबारातही उमटताना दिसून  येत असत़े त्यामुळे नंदुरबारातही मोठय़ा संख्येने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असत़े साधारणत: महिन्याभरा पुर्वीच नंदुरबारात पतंगोत्सवाचे वेध लागत असतात़ मकर संक्रांतीच्या दिवशी तर प्रत्येक जण आपआपल्या गच्चीवर तसेच जिथे मोकळी जागा मिळेल तेथे पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात़