शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निधी गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा दिलेल्या ९ जणांची चाैकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST

जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्यानुसार सर्व ९ जण सकाळी ११ वाजेपासून आले होते. त्यांची चाैकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ...

जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्यानुसार सर्व ९ जण सकाळी ११ वाजेपासून आले होते. त्यांची चाैकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तीन विस्तार अधिकारी नियुक्त केले होते. दरम्यान, पदाधिकारी व शासकीय सेवकांनी आणलेल्या हिशोबाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात दिवसभर आकड्यांचा खेळ सुरू राहिल्याने निष्कर्ष निघू शकला नाही. परिणामी माजी सरपंच अमरसिंग हुपा वळवी, प्रशासक आर. एम. देव, प्रशासक जे. एस. बोराळे, माजी सरपंच उषाबाई बोरा, माजी उपसरपंच ताजमहंमद अल्लारखा मक्राणी, विद्यमान सरपंच राजेश्वरी इंद्रवदन वळवी, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, आनंदा पाडवी व ग्रामसेवक एस. आर. कोळी यांना गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून पुन्हा जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून बुधवारी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व ९ जणांनी केवळ त्यांचे लेखी जबाब आणल्याची माहिती आहे. अक्कलकुवा ग्रामंपचातयींच्या दप्तरात मोठ्या प्रमाणात तफावती असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गुरुवारी दिवसभर सर्वांची समोरासमोर चाैकशी पूर्ण झाल्यानंतरही अंतिम निष्कर्ष समोर येण्यास मात्र उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाचा निकाल तातडीने लागणे शक्यच नसल्याचा दावा प्रशासकीय वर्तुळातून केला जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्यामुळे फावले

बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक येथे आले होते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व वरिष्ठ अधिकारी हे नाशिक येथे गेले होते. यातून तीन विस्तार अधिकाऱ्यांनी अक्कलकुवा ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी नोटिसा बजावलेल्या ९ जणांची चाैकशी केली. चाैकशीवेळी संबंधितांनी त्यांच्या कार्यकाळात निधी खर्च केल्याचे पुरावे सादर केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

२०१६ ते २०२० या काळात अक्कलकुवा ग्रामपंचायतीत नियुक्त ग्रामसेवक, प्रशासक आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी शहरात केलेल्या विकासकामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप व तक्रारी जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. यानुसार ही चाैकशी सुरू आहे.