शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गतीमान प्रशासन उपक्रमाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासकीय कामकाज गतिमान करुन नागरिकांच्या समस्या वेळेत  सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रशासकीय कामकाज गतिमान करुन नागरिकांच्या समस्या वेळेत  सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिका:यांनी नवापुरात बैठक घेतली़ यावेळी तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला़जिल्हा प्रशासन आठवड्यातील एक दिवस तालुकास्तरावर जाऊन कामकाज करणार असल्याचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी यापूर्वी जाहिर केले होत़े त्यानुसार मंगळवारी या उपक्रमाचा शुभारंभ नवापूर तालुक्यातून करण्यात आला. उपक्रमादरम्यान अधिका:यांनी तालुक्यातील विविध भागात भेटी दिल्या़़ अधिका:यांनी विकासकामे, योजना, टंचाईग्रस्त गावांमध्ये भेटी दिल्या़ जिल्हाधिकारी मंजुळे हे धनराट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत आवश्यक सुविधांसह इमारतीचे त्वरीत हस्तांतरीत करण्याच्या सुचना केल्या़ तसेच धनराट आश्रमशाळा आणि सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटीकेस भेट देऊन वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची माहिती घेतली. दरम्यान तहसील कार्यालयात कामकाज आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, तहसीलदार सुनिता ज:हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

क्षेत्रभेटीवर गेलेल्या अधिका:यांनी नवापुर तालुक्यात उपस्थित असलेल्या जिल्हाधिका:यांची भेट घेत तात्काळ आढावा सादर केला़ यात त्रुटी असलेल्या योजना आणि कामांना गती देण्याच्या सूचना केल्या़ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी  टंचाईग्रस्त गावांना कुरडी आणि खैरवे धरणातून पाणी देण्याच्या सुचना केल्या़ प्रसंगी लोकप्रतिनिधींनी बाजू मांडली़ चिंचपाडा येथील रोहयोच्या कामांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नवापुर पालिकेत भेट देत लोकप्रतिनिधी व अधिका:यांसोबत संवाद साधला़  स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास योजना आणि 14 व्या वित्त आयोगांतर्गत योजनांचे प्रस्ताव तातडीने पुर्ण करून कामांना गती देण्याचे त्यांनी सांगितल़े