या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. कीर्तीलता वसावे यांचा सन्मान डॉ. युवराज पराडके, डॉ.प्रमोद कटारिया यांनी केला. याप्रसंगी डॉ.साईसिंग पाडवी, समुपदेशक कैलास माळी, परिसेविका शबरी गावीत, निर्मला गावीत आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात घेण्यात झाला. या वेळी परिचारिका भगिनीनी साडी परिधान केल्या होत्या. तसेच कंत्राटी तत्वावर कार्यरत महिला सफाई कर्मचारी यांचा सन्मान साडी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्तीलता वसावे यांनी केला. या वेळी डॉ.युवराज पराडके म्हणाले की, महिलांची सहनशीलता खूप मोठी असते. कारण प्रत्येक स्त्री आई होते आणि आई होणे म्हणजे या जगात ईश्वरापेक्षाही मोठी गोष्ट आहे म्हणून आपण नेहमीच महिलांच्या सन्मान केला पाहीजे. यानंतर डॉ.प्रमोद कटारिया यांनीदेखील महिलांचा सन्मान करत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कैलास माळी तर आभार चंद्रकांत पवारा यांनी मानले. कार्यक्रमासाठी रवींद्र पिंपळे, बजरंग भंडारी, रायसिंग कुवर, प्रमोद तोडकर यांनी परिश्रम घेतले.