शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

एसटीही आता ‘भरेल तेव्हाच सुटेल़़’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिने बंद असलेली एसटी रडतखडत रस्त्यावर आली आहे़ यानंतर गेल्या १० दिवसांपूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊनमुळे चार महिने बंद असलेली एसटी रडतखडत रस्त्यावर आली आहे़ यानंतर गेल्या १० दिवसांपूर्वीच जिल्हाबाह्य वाहतूकीस परवानगी मिळाली आहे़ परंतु कोरोनाचा धसका प्रवाशात कायम असल्याने एसटीला प्रवाशांची प्रतिक्षा आहे़ परिणामी खाजगी वाहनांप्रमाणे एसटी बसही ‘भरली की चालली’ अशीच झाल्याची स्थिती आहे़‘लोकमत’ने प्रवाशांचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी नंदुरबार बसस्थानकात भेट दिली होती़ यावेळी बसस्थानकात शुुकशुकाट असल्याचे दिसून आले़ स्थानकात उभ्या असलेल्या नाशिक डेपोच्या बसेसमध्ये एखाद दुसरा प्रवासी दिसून आला़ एका सीटवर एकच प्रवासी असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्नच उरला नव्हता़ दुसरीकडे बसस्थानकात चालक आणि वाहक एकमेकांसोबत गप्पा करत असल्याचे दिसून आले़ प्रवासीच नसल्याने नाशिक आणि धुळ्याकडे जाणाऱ्या बसेस थांबून होत्या़ नंदुरबार बसस्थानकावरून सध्या नियमित २६ फेºया सुरू करण्यात आल्या आहेत़ यात नाशिक, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, आणि शिरपूर येथील डेपोमधून बसेस स्थानकात येत आहेत़ जिल्हांतर्गत सेवेत नवापूर, शहादा, अक्कलकुवा आणि तळोदा या तालुका मुख्यालयातून थेट बसेस सुरू आहेत़ परंतु यातून प्रवाशांचा प्रतिसाद तुरळक असल्याने उत्पन्नावर परिणाम होत आहे़लॉकडाऊनपूर्वी १२० बसेस असलेल्या नंदुरबार आगारातून दर दिवशी ६७६ बसफेºया होत होत्या़ यातून ४२ हजार किलोमीटरचा प्रवास दर दिवशी बसेस करत होत्या़ आगाराचे दिवसाचे उत्पन्न हे १४ लाख रूपये होते़ लॉकडाऊननंतर चार महिने बसफेºया बंद राहिल्याने आगाराला महिन्याकाठी ४ कोटी २० लाख तर चार महिन्यात १६ कोटी ८० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे़ मिशन बिगिन अंतर्गत १८ बसफेºया सुरू करण्यात आल्या होत्या़ यातून ५९९ किलोमीटर प्रवास होवून त्यातून अत्यंत नगण्य असे उत्पन्न एसटीच्या नंदुरबार आगाराला मिळाले होते़ शासनाने जिल्हाबाह्य बसफेºया सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर अडचणी सुटणार अशी अपेक्षा होती़ परंतु प्रवासीच नसल्याने आगाराकडून काही बसेस रद्द केल्या जात आहेत़४आजघडीस नंदुरबार आगारातून २६ फेºया इतर जिल्ह्यासाठी आणि जिल्हांतर्गत होत असल्याची माहिती दिली गेली़ यात नाशिक ५, धुळे १०, शिरपूर १, पुणे २, तळोदा ३, शहादा ३ तर नवापूर शहरापर्यंत २ बसफेºया केल्या जात आहेत़ बाहेरील आगारात नाशिक, शिरपूर, पाचोरा या तीन आगारातून नियमित बससेवा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ धुळे आगारातून एकही बस नंदुरबारसाठी अद्याप सोडली जात नसल्याची माहिती दिली गेली आहे़ जिल्हाबाह्य सोडल्या जाणाºया बसेसमुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे होणारे हाल थांबले आहेत़ धुळे येथून अनेक कर्मचारी अप-डाऊन करत असल्याची माहिती दिली गेली आहे़ यामुळे सायंकाळी थोडेफार प्रवासी वाढत असल्याची माहिती आगाराने दिली आहे़४कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी बसस्थानकात थर्मल स्कॅनिंग मशीनसह एक कर्मचारी तसेच सॅनेटाझरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले होते़ परंतु बुधवारी बसस्थानकात येणाºया किंवा जाणाºया प्रवाशांची चौकशी करणारेही कोणी दिसून आलेले नाही़ आगारातून बसेस आल्यानंतर किंवा सोडताना सॅनेटाईज केल्या जात असल्याचे तसेच चालक व वाहकांन मास्क आणि सॅनेटायझर वापराची सूचना करण्यात आल्याची माहिती दिली गेली़