शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील बसस्थानक बनणार एस.टी.चे प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:32 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : शहराबाहेर लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या   नवीन बसस्थानकात चालक-वाहकांसाठी विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे या बसस्थानक इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम सुरू आहे.  याठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने आता बसस्थानक कार्यान्वित होण्याची आशा मावळली आहे.स्व.पी.के. अण्णा पाटील हे 1993-94 मध्ये महाराष्ट्र राज्य ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 18 : शहराबाहेर लोणखेडा बायपास रस्त्यालगत असलेल्या   नवीन बसस्थानकात चालक-वाहकांसाठी विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. त्यामुळे या बसस्थानक इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम सुरू आहे.  याठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने आता बसस्थानक कार्यान्वित होण्याची आशा मावळली आहे.स्व.पी.के. अण्णा पाटील हे 1993-94 मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असताना शहादा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर मामाचे मोहिदे शिवारात नवीन बसस्थानक मंजूर झाले होते.        सध्याचे बसस्थानक अपूर्ण पडत असल्याने नवीन व सुसज्ज बसस्थानक व्हावे, असे त्यामागील धोरण होते. त्यासाठी मोहिदा शिवारातील जमीन खरेदी करून सुमारे सव्वा कोटी           रुपये खर्चाचे भव्य बसस्थानकाचे काम झाले आहे. मात्र हे बसस्थानक शहरापासून लांब असल्याने प्रवासी संघटना व प्रवाशांनी हे नवीन बसस्थानक सुरू करण्यास विरोध केला. मात्र परिवहन महामंडळाने हा विरोध न जुमानता काही ठिकाणच्या बसफे:या नवीन बसस्थानकावरुन सोडण्यास सुरुवात केली होती. मात्र नवीन बसस्थानकावरून पुरेसे प्रवासी मिळत नसल्याने बसेस पुन्हा जुन्या बसस्थानकात येत होत्या. महिनाभरात डिङोलचा खर्च वाढल्याने आगाराचे नुकसान होऊ लागले होते. त्यामुळे नवीन बसस्थानकावरून बसेस          सोडणे एस.टी. महामंडळाला बंद करावे लागले. त्यानंतर या बसस्थानकात पुन्हा शुकशुकाट जाणवू लागला. या बसस्थानकाचा काहींनी रात्रीच्यावेळी झोपण्यासाठी वापर सुरू केला. बसस्थानकातील फरशी, लोखंडी ग्रील व इतर साहित्य चोरीला जाण्याचे प्रकारही सुरू झाले. मात्र आता याठिकाणी चालक-वाहक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्याने करोडो रुपये खर्च करून अनेक वर्षापासून निरुपयोगी ठरलेल्या या इमारतीचा वापर सुरू होणार आहे.