शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांअभावी एसटी चालकांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 11:27 IST

रस्त्यांची स्थिती सुधारावी : विभागीय कार्यालयाकडे मांडल्या व्यथा

नंदुरबार : अक्कलकुवा, नवापूर, शहादा आदी आगारातील एसटी बसचालकांचे सध्या मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़ दुर्गम भागात पावसामुळे रस्त्यांची दैनावस्था झालेली आह़े त्यामुळे एसटी चालकांना ओबडधोबड रस्त्यांवरुन बस चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आह़े याबाबत अक्कलकुवा आगाराकडून विभागीय कार्यालयाकडे आपल्या व्यथा मांडण्यात आलेल्या आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील अमोनी, तुळाजा, दलेलपूर मार्ग तसेच रेवानगर आदी मार्ग, नवापूर तालुक्यातील रंगावली नदी डॅम जवळील परिसर, नागङिारी रस्ता, कोळदा नाला परिसर, तोरणमाळकडे जाणारा मार्ग, तसेच शहादा आगाराअंतर्गत येणारा, शेल्टी, शिंदे, झुरखेडा आदी मार्गावरील रस्त्याची दैनावस्था झालेली आह़े नवापूर तालुक्यात नुकतेच महापुराने थैमान घातले होत़े यात, तालुक्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ महापुरामुळे तीन दिवस एसटी बसेसदेखील बंद ठेवण्यात आलेल्या होत्या़ सोमवारपासून एसटी बसफे:या नियमित सोडण्यात आलेल्या आहेत़ असे असले तरी अनेक रस्ते ओबडधोबड झाले असल्याने या मार्गावरुन बस ने-आण करीत असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, तळोदा तालुक्याचीसुध्दा आह़े अक्कलकुवा आगारातर्फे अनेक दुर्गम भागातील बसफे:या बंद करण्यात आलेल्या आहेत़ अमोनी, तुळाजा बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्या ऐवजी दलेलपूर मार्गे बसेस वळविण्यात आलेल्या आहेत़ रेवानगर मार्गे बसफेरी सुरु करण्याची मागणीकाही दिवसांपूर्वी रेवानगर मार्गे बसफेरी सुरु करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून अक्कलकुवा प्रशासनाला करण्यात आलेली होती़ त्यानुसार अक्कलकुवा आगाराकडून संबंधित मार्गाचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े परंतु हा मार्ग वाहतुकीस योग्य नसल्याचे यातून दिसून आले होत़े त्यामुळे या मार्गावर बसफेरी होणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल़े फाटय़ापासून माघारी फिरतात बसेस्अक्कलकुवा तालुक्यातील अनेक ठिकाणी गावरस्ते ओबडधोबड झालेले असल्याने अनेक बसेस थेट गावात न जाता गावाच्या फाटय़ापासूनच माघारी फिरत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना फाटय़ापासून पुढे एक ते दीड किलो मीटर पायी जावे लागत असल्याचे सांगण्यात आल़े घाटांवरील रस्तेही धोकेदायकअक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात अनेक घाटरस्ते आहेत़ या ठिकाणाहून वाहतूक करणे धोकेदायक आहेत़ त्यामुळे अक्कलकुवा आगाराकडून अशा घाट रस्त्याचेही सव्रेक्षण करण्यात आले होत़े सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला असल्याने साहजिकच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आह़े रस्त्यांवर दरडी कोसळत असल्याने मार्गावर सर्वत्र चिखल जमा होत असून रस्तेही ओबडधोबड होतात़ रात्रीच्या वेळी अशा मार्गावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकेदायक ठरत असत़े त्यामुळे अशा परिस्थितीत घाटमार्ग अधिकच धोकेदायक ठरत असतात़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व आगार प्रशासन यांनी समन्वयातून यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े