शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कारागिरांच्या शोधासाठी पथके कोलकाताकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सराफ व्यावसायिकांचे 1 किलो सोने बंगाली कारागिरांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी शहादा शहरात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सराफ व्यावसायिकांचे 1 किलो सोने बंगाली कारागिरांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी शहादा शहरात उघडकीस आली होती़ सात बंगाली कारागिरांनी ‘कलाकारी’ करत 33 लाख 25 हजार रुपयांचे सोने चोरुन नेल्याचे समोर आले होत़े दरम्यान 875 ग्रॅम सोने पळवणा:या कारागिरांच्या शोधार्थ पथके पश्चिम बंगाल राज्यात रवाना झाली आहेत़ शहरातील सराफ व्यावसायिक शुद्ध सोन्याच्या बदल्यात बंगाली कारागिरांकडून आवश्यक त्या डिझाईनचे दागिने तयार करून घेतात़ या निमित्ताने 20 ते 25 बंगाली कारागिर अनेक वर्षापासून शहरात वास्तव्यास आहेत़ केवळ विश्वासावर कारागिर आणि सराफ व्यावसायिक यांच्यात व्यवहार सुरु असतात़ दरम्यान या विश्वासाला दिपनकर जयदेव मेहती उर्फ दीपक बंगाली, श्यामल अमर सामंत उर्फ श्यामल बंगाली, चंदू बंगाली, बापन सिंग बंगाली, कार्तिक बंगाली, आकाश बंगाली या सातही जणांनी तडा दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी समोर आला होता़ शहरातील महावीर चौकात राहणा:या या कारागिरांकडे शहादा सराफ बाजारातील व्यावसायिकांनी गेल्या महिनाभरात वेळावेळी शुद्ध सोने देऊन दागिने तयार करण्यासाठी सांगितले होत़े तब्बल 875 ग्रॅम सोने प्राप्त झाल्यानंतर या सातही जणांनी सोमवारी पळ काढला़याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात कचरुलाल हिरालाल जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक भदाणे करत आहेत़ सोमवारी आणि मंगळवारी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पथकांनी जिल्ह्यात शोधमोहिम राबवली होती़़ सर्व कारागिर पश्चिम बंगाल राज्यातील असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली़ विशेष म्हणजे सर्व संशयित वेगवेगळ्या मार्गाने शहाद्यातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेणे पोलीसांनी सुरु केले आह़े