लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील तºहाडीतर्फे बोरद येथे कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन ग्रामपंचायतीतर्फे गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले.तºहाडी गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून लहान ट्रॅक्टरद्वारे संपूर्ण गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. या वेळी जि.प. सदस्य धनराज पाटील, सरपंच गोवर्धन ठाकरे, पोलीस पाटील दिनेश ठाकरे, मुकुंद पाटील, महेश पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, पुष्पलाल पाटील, छोटू ईशी, संजय चौधरी यांच्यासह अंगणवाडी सेविका प्रमिला कुवर, मंगला ईशी यांच्यासह गावातील इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.कोरोना विषाणू या जीवघेण्या आजाराबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शनही करून काळजी घेण्याचे सूचविण्यात आले. तसेच संचारबंदीच्या काळात शासकीय नियमांचे पालन काटेकोर करण्याचे आवाहनदेखील याप्रसंगी ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले.
तºहाडी ग्रामपंचातीतर्फे औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:08 IST