मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी हिरीबेन श्रॉफ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, कोणतीही कला माणसाच्या सर्वांगीण विकास करण्यास कारणीभूत ठरते, म्हणून सर्वांगीण विकासासाठी कलेची जोपासना करणे आवश्यक आहे. या चित्रकला स्पर्धेत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. त्यात प्रथम क्रमांक वैष्णवी दीपक चौधरी, द्वितीय क्रमांक युक्ता मधुकर मोरे, तृतीय क्रमांक भाविका गणेश माळी, उत्तेजनार्थ निशा सुनील येवले, मिताली विशाल सोमवंशी, मृदुला प्रशांत कासार यांनी क्रमांक पटकवला.
उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील, चंद्रकांत सोनवणे, कला विभाग प्रमुख महेंद्र सोमवंशी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेश शाह यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून महेंद्र सोमवंशी, हेमंत पाटील, शिवाजी माळी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.