शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

ग्रामस्थांचा श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग : शहादा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 13:11 IST

38 गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेचा शुभारंभ, गावे पाणीदार करण्याचा निर्धार

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 11 : गावे पाणीदार करण्यासाठी तालुक्यातील अबालवृद्धांनी कंबर कसली असून, वॉटरकप स्पर्धेला 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून शुभारंभ झाला. या स्पर्धेत तालुक्यातील 38 गावांनी सहभाग घेतला आहे.सिने अभिनेता आमिरखान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणा:या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेची 8 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सुरूवात झाली. या योजनेंतर्गत गावे पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानास सुरूवात केली आहे. नवानगर, लंगडी येथे गावातील लोकांनी पारंपरिक वेशभूषा करून ढोल वाद्याच्या घोषात व गाणी म्हणत श्रमदानाला सुरूवात केली. भोंगरा येथे किशोवयीन मुलींच्या गटाने गाव पाणीदार करण्याचा निर्धार करून भरदुपारी रणरणत्या उन्हात श्रमदान केले. मुलींचा हा उत्साह पाहून इतरांनीही श्रमदानात सहभाग घेतला. तालुक्यातील वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या 38 गावांपैकी नवानगर, लंगडी, भोंगरा, भुलाणे, काकरदा दिगर, बोराळे-मातकुट, बामखेडा, सुलतानपूर आणि वाडी पुनर्वसन या आठ गावांनी 8 एप्रिलपासून श्रमदानास सुरूवात केली. सी.सी.टी., नाल्यात दगडी बांधकाम, कंपार्टमेंट बंडींग, शोषखड्डे, रोपे तयार करणे आदी कामे या सर्व गावांमध्ये श्रमदानातून करण्यात येत आहेत.पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रकाश सोनवणे, गुणवंत पाटील, वॉटरकप स्पर्धेतील गावा-गावात जावून ग्रामस्थांना श्रमदानाबाबत प्रोत्साहन व मार्गदर्शन करीत आहेत. वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या 38 गावातील 180 लोकांनी पाणी फाऊंडेशनचे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या सर्व प्रशिक्षणार्थीनी गावातील इतर ग्रामस्थांना प्रशिक्षण देवून गावे पाणीदार करण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात बालगोपालांसह तरूण, ज्येष्ठ नागरिकही सहभागी होत आहेत.