शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

धुळे-सूरत महामार्गाच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:31 IST

महेश पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील महाराष्ट्र व गुजरात बॉर्डरलगत असलेल्या बेडकीपाडापासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत १४० किलोमीटरचा ...

महेश पाटीललोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील महाराष्ट्र व गुजरात बॉर्डरलगत असलेल्या बेडकीपाडापासून धुळे जिल्ह्यातील फागणेपर्यंत १४० किलोमीटरचा धुळे-सुरत महामार्ग चौपदरीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले होते. आता या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळाली असून, नवापूर ते धुळे अंतर साधारण १२० किलोमीटर आहे. सध्याचा महामार्गावरून धुळ्याला जाण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. परंतु चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने दीड ते पावणेदोन तास लागतील. यामुळे वेळेची व इंधनाची बचत होणार आहे.धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरण कामामागे अनेक वर्षांपासून लागलेली अडथळ्य़ांची मालिका आता थांबण्याची चिन्हे आहेत. विविध संकटांवर मात केल्यानंतर या कामाला गती मिळाली आहे. सुरुवातीला ‘इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अ‍ॅण्ड फायनान्शिअल सर्व्हिसेस’ या कंपनीला चौपदरीकरणाचे काम देण्यात आले होते. आर्थिक संकटात सापडल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठप्प होते.धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी नवापूर ते अमरावतीपर्यंतचा ४८०.७९ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग १ एप्रिल २०१३ रोजी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. तत्कालीन काँग्रेस सरकारने प्रकल्पाला मंजुरी देऊन एल अ‍ॅण्ड टी कंपनीला काम दिले होते. भूसंपादनातील दिरंगाईसह विविध अडचणींमुळे काम सुरू होण्यापूर्वीच एल अ‍ॅण्ड टी कंपनीने काम सोडून   दिले. सत्तापरिवर्तन झाल्यावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नवापूर शहरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. नवापूर ते फागणे १४०.७९, अमरावती ते चिखली १९४ कि.मी. अशा दोन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार होते. चौपदरीकरणाचे संपूर्ण काम ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर असल्याने गुंतवणूकदार तयार करून ८० टक्के भांडवल तयार करण्याचे मोठे आव्हान कंत्राटदार कंपनीपुढे होते. चौपदरीकरणाच्या कामासाठी गुंतवणूकदार मिळत नसल्याने अडचणीत भर पडली होती. त्यामुळे आर्थिकसह विविध कारणांमुळे महामार्गाचे काम रेंगाळले. नवापूर तालुक्यात ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. कसेबसे काही ठिकाणी काम पूर्ण करण्यात आले. जुलै २०१८ ला या मार्गाचे काम ठप्प झाले. दरम्यानच्या काळात जीएसव्ही कंपनीने ६५ टक्के काम केले होते. आर्थिक कारणास्तव पुन्हा ठेकेदार बदलून मुंबई येथील जे.एम. म्हात्रे यांना रखडलेले चौपदरीकरणाचे काम देण्यात   आले. आता कामाला चांगली गती मिळाली असली तरी काम वेळेत  पूर्ण होते की, पुन्हा विलंब लागेल यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

महामार्गावरील धुळीचे साम्राज्य कधी संपले?महामार्गावरील नवापूर, रायंगण, सावरट, सोनखांब व कोंडाईबारी घाटात महामार्गाच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याची तात्पुरती दुरुस्ती करताना खड्ड्यांमध्ये मातीचा भराव करण्यात आला होता. परंतु या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा मोटरसायकलस्वार व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर कंपनीने लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकारामुळे अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे.

कोंडाईबारी घाट कटिंगचे काम युद्धपातळीवर नवापूर ते फागणेपर्यंत १४० किलोमीटर अंतरावरील महामार्ग चौपदरीकरण व कोंडाईबारी घाट कटिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील छोटे-मोठे पूल तयार करण्याचे कामदेखील सुरू आहे. ज्या ठिकाणी बस पुलावरून ३५ फूट नदीत कोसळली, त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होतो. तेथेदेखील पर्यायी पुलांचे बांधकाम करून लवकरात लवकर वाहुतकीसाठी खुला करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

१२२ पुलांचे बांधकाम सुरूनवापूर ते फागणे महामार्गवरील उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल व मुख्य महामार्गालगतचे सर्व्हिस रोड तसेच नद्या, नाले, ओढे यांच्यावरील मोऱ्या रुंदीकरण कामाला सुरुवात झाली  आहे. नवापूर तालुक्यातील वाकीपाडा, रंगावली, रायंगण, गंगापूर, विसरवाडी, पानबारा, कोंडाईबारी येथील मोठे पूल मृत्यूचे सापळे बनले होते. तसेच लहान व मोठे असे एकूण १२२ पूल आहेत. उड्डाणपूल, पाच मोठे बोगदे तर सात लहान बोगदे आणि तीन रेल्वे उड्डाणपुलांची संख्या आहे. या पुलांचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

नवापूर तालुक्यातील नवापूर नवरंग रेल्वे गेट व चिंचपाडा रेल्वे गेटवर होणारी वाहतुकीची कोंडी व तास्‌न तास वाहतुकीचा खोळंबा लवकरच दूर होणार आहे. दोन्ही ठिकाणी अवघ्या काही महिन्यांमध्ये रेल्वे ब्रीजवरील पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असून, नवापूर व चिंचपाडा रेल्वे गेटजवळील ७० टक्के काम पूर्णत्वास नेले आहे. सध्या महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. जलदगतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग ठेकेदाराकडून चांगले काम करून घेत आहे. २०२२ पर्यंत महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल.- रवींद्र हिंगोले, अभियंते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग, धुळे