शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांसाठी विशेष रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

नंदुरबार : केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी रेल्वे कोविड कोच पाठविण्यात येत आहे. ...

नंदुरबार : केंद्रीय रेल्वे व आरोग्य विभागाच्या वतीने जास्त रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये उपचारासाठी रेल्वे कोविड कोच पाठविण्यात येत आहे. त्यानुसार खासदार डॉ.हीना गावित यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे रेल्वे कोच उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. या पाठपुराव्याला यश आले आहे. नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर ११ रोजी रेल्वे कोविड कोच दाखल झाला आहे. १२ एप्रिलपासून रुग्णांवर उपचारासाठी हे कोच उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार डॉ.हीना गावित यांनी दिली.

गतवर्षी देशासह राज्यात व जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला होता. वाढता प्रादुर्भाव घेता केंद्रीय आरोग्य मंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वे कोविड कोच वर्षभरापूर्वी तयार केल्या होत्या. या रेल्वे कोविड कोच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत व तेथे वैद्यकीय सुविधा पुरविणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी पाठविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता रुग्णांच्या उपचारासाठी खासदार डॉ.गावीत यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करून नंदुरबार जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे कोच उपचाराकरिता उपलब्ध व्हावी, असा पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. ११ रोजी नंदुरबार येथील रेल्वेस्थानकाच्या प्लार्टफार्म क्रमांक तीन याठिकाणी रेल्वेची कोविड कोच उपलब्ध झाले. या कोविड रेल्वेमध्ये २० डबे असून एका कोचमध्ये १६ ते २४ बेड असतील. असे एकूण ३२० बेड आहेत.

मच्छरदानीसह बाथरूम व दोन बायोटॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एका कोचमध्ये दोन ऑक्सिजन व कूलरची व्यवस्था असणार आहे. कोचमध्ये तीनशे ते चारशे रुग्ण कमी लक्षणे सदृश्य असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येईल.

या रेल्वे कोचमध्ये नंदुरबार जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येतील. तसेच या कोचच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. १२ एप्रिलपासून रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार गावीत यांनी दिली.