महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील दोंदवाडा स्वामी परमेश्वरानंदजी महाराज यांनी हे यज्ञ अनुष्ठान सुरू केले आहे. याबाबत त्यांनी सांगितले की, अग्नीमध्ये मूळतः शुद्धिकरणाचा गुण असतो. अग्नी आपल्या उष्णताने संपूर्ण वाईट गोष्टी, दोष, असाध्य रोगांंचा नाश व नायनाट करते. अग्नीच्या संपर्कात जो आला त्यास शुद्ध करते. त्यामुुुळे सनातन काळापासून यज्ञ, हवनची परंपरा चालत आली आहे. हवनमध्ये टाकण्यात येणाऱ्या समिधा पर्यावरणास शुद्ध ठेवते तसेच मानवास बाधा पोहोचवणाऱ्या विविध विषाणूंचा नायनाट करते. या हवन व अग्निहोत्रामुळे विविध प्रकारचेे असाध्य रोग बरे होतात. हवनमध्ये टाकण्यात येणारे कापूर व सुगंधी द्रव्य वातावरणास प्रसन्नता आणतात. त्यामुळे मन-मस्तिकावर सकारात्मक प्रभाव पडतो. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या या होम-हवनामुळे अखिल मानव जातीचे कल्याण व्हावे. या महामारीपासून मुक्तता व्हावी, या भावनेतून हा यज्ञ करण्यात येत आहे.
दोंदवाडा येथे कोरोनामुक्तीसाठी विशेष यज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST