शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेतक:यांसाठी लवकरच नंदुरबार येथे खास रेडिओ केंद्र

By admin | Updated: April 10, 2017 23:43 IST

कृषी विज्ञान केंद्रात सहक्षेपण केंद्र : स्थानिक भाषेतून कार्यक्रमांचे सादरीकरण, 76 लाख मंजूर, 20 किलोमीटरचे क्षेत्र

 मनोज शेलार ल्ल नंदुरबार : शेतक:यांना आधुनिक शेतीकडे वळविणे, हवामानाचा अंदाज व त्यानुसार पीक नियोजन करणे यासंदर्भातील माहिती स्थानिक बोलीभाषेत देता यावी यासाठी स्थानिक रेडिओ केंद्र नंदुरबारात सुरू होणार आहे. त्यासाठी 76 लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील अशा प्रकारचे हे तिसरे रेडिओ केंद्र राहणार आहे.नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भागात आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता शेती करताना पिकांचे नियोजन करणे मोठे जिकिरीचे ठरते. शिवाय शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा पाहिजे तसा शिरकाव अद्यापही झालेला नाही. ही बाब लक्षात घेता शेतक:यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, हवामानाआधारित पीक संगोपन व नियोजन करता यावे यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनातर्फे विविध पातळीवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यासाठी नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचीदेखील मोलाची भर पडत आहे. आता त्याचे पुढचे पाऊल म्हणून स्थानिक रेडिओ केंद्र सुरू करण्याचा निर्णय कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्रातर्फे घेण्यात आला आहे. त्यास केंद्र शासनाचीदेखील मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात 76 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. येत्या चार महिन्यात हे रेडिओ केंद्र कार्यान्वित होणार   आहे.कोळदा, ता.नंदुरबार शिवारात असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात हे रेडिओ केंद्र उभारले जाणार आहे. त्याच ठिकाणी इमारत आणि सहप्रेक्षपण केंद्र कार्यान्वित राहणार आहे. त्याचे संचलन अर्थातच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र करणार आहे. कार्यक्रमाचा, प्रक्षेपणाचा आणि कर्मचा:यांसह इतर खर्च पहिल्या तीन वर्षाकरिता केंद्र सरकार देणार आहे. त्यानंतर मात्र स्थानिक उत्पन्नाच्या माध्यमातून अर्थात जाहिरात आणि प्रायोजकांच्या माध्यमातून मिळणा:या महसुलातून खर्च भागवावा लागणार आहे.या रेडिओ केंद्राची प्रक्षेपण क्षमता सुरुवातीला केवळ 20 किलोमीटर अंतराची राहणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रक्षेपण क्षमता वाढविण्यात येणार आहे. रेडियो केंद्रातून केवळ शेतक:यांसाठीच कार्यक्रमांचे प्रक्षेपण राहणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक बोलीभाषेत ते राहिल अर्थात मराठी आणि आदिवासी भाषेत हे कार्यक्रम सादर करण्यात येतील. हवामानाचा पूर्व अंदाज, त्यानुसार शेतक:यांनी काय करावे, त्या त्या हंगामातील पिकांची काळजी, पिकांचे नियोजन, पाण्याची पाळी, खतांचा मात्रा यासह देश आणि जगात कृषी क्षेत्रात काय उपक्रम चालले आहेत त्याची माहितीही दिली जाणार आहे. याशिवाय स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून शेती आधारित जनजागृतीपर कार्यक्रमही तयार करवून घेत त्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. दररोज सायंकाळी दोन तास या रेडिओ केंद्रातून प्रक्षेपण केले जाणार आहे.राज्यातील तिसरेराज्यात नंदुरबारचे रेडिओ केंद्र हे तिसरे केंद्र राहणार आहे. यापूर्वी बारामती येथे हे केंद्र सुरू करण्यात आले. तेथील यशस्विता लक्षात घेत बाभळेश्वर (जिल्हा अहमदनगर) येथे सुरू करण्यात आले. आता खास बाब म्हणून नंदुरबारात हे रेडिओ केंद्र कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुरू होत आहे.नंदुरबारसारख्या आदिवासी भागात केंद्र शासनाने खास शेतक:यांसाठी रेडिओ केंद्र सुरू करण्यास परवानगी देणे ही मोठी बाब आहे. या माध्यमातून शेतक:यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि हवामानाची माहिती दिली जाणार आहे. लवकरच या केंद्राच्या कामास सुरुवात होणार आहे.-सुभाष नागरे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.