शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

शेतक:यांसाठी ‘उकीरडे’ ठरताहेत उत्पन्नाचा स्त्रोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा :  खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा :  खळवाडीत किंवा गावाच्या सिमेवर गुरांचे शेण टाकून तयार केलेले निरुपयोगी उकीरडे शेतक:यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत बनले आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील सपाटीच्या गावांमध्ये वर्षभर तयार होणा:या या  शेणखताची खरेदी करण्यासाठी खान्देशातून मोठे शेतकरी गर्दी करत असून यातून  शेतक:यांना अर्थप्राप्तीचा नवा मार्गही सापडला आह़े  अक्कलकुवा तालुक्यात सातपुडय़ाच्या दुर्गम भागासह सपाटीवरील गावांमध्ये सर्वच शेतक:यांकडे पाळीव गुरे आहेत़ काही जणांनी दुग्धव्यवसाय म्हणून तर काहींनी शेतीसाठी उपयोगी म्हणून गुरांचे संगोपन केले आह़े यातून घरोघरी किमान चारपेक्षा अधिक गुरे हमखास दिसून येतात़ भल्या पहाटे उठून गुरांचे शेण काढून ते उकीरडय़ावर टाकत शेतकरी त्यांचा साठा करतात़ वर्षभर  होणा:या ढिगाला गेल्या दोन वर्षापासून मोठी मागणी आह़े सेंद्रीय शेतीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या शेणखताच्या खरेदीसाठी जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातून शेतकरी वाहनांसह येथे भेटी देत आह़े शेतक:यांसोबत वार्षिक करार करुन वाहनाच्या हिशोबाने खत भरुन घेत तातडीने पैसेही देत आहेत़ यातून दुष्काळातही शेतक:यांना आधार मिळाला असून सपाटीच्या गावांमध्ये शेणखताच्या उद्योगाचा फायदा मजूरांनाही होत असून त्यांनाही खत वाहून नेण्याचा रोजगार उपलब्ध झाला आह़े तालुक्यातून दरदिवशी 15 वाहने परजिल्ह्यात जात आहेत़ शेतक:यांकडून बांबूचे मोठे टोपले शेणखत मोजणीसाठी वापरले जात आह़े सपाटीच्या गावांमध्ये 110 ते 130 रुपये टोपले यादराने शेणखताची विक्री होत आह़े बहुतांश शेणखत हे कोरडेच खरेदी करण्याकडे मोठे शेतकरी भर देतात़  सहा चाकीट्रक साधारण 75 टोपले खत टाकल्यास ते पूर्णपणे क्षमतेने भरत़े यातून शेतक:याला आठ हजार 500 रुपये सहज मिळतात़ खत भरणे आणि वाहतूकीची जबाबदारी ही संबधित खरेदीदाराची असत़े  शेतक:यांना 15 गुरांच्या मागे आठवडय़ात 50 त 60 टोपले शेणखत मिळत असल्याने त्यांच्याकडून जागा उपलब्ध असल्यास छोटे ढिग करुन उन्हात सुकवण्यासाठी टाकले जात़े  एका एकराना साधारण 50 टोपले शेणखत लागत असल्याने बहुतांश शेतकरी वेळावेळी येथे भेट देत बुकींग करुन ठेवतात़ यातून येथील शेतक:यांना महिन्याकाठी 10 हजार मिळू लागले आहेत़ बहुतांश शेतकरी एकापेक्षा अधिक ठिकाणी शेणखताचा साठा करत आहेत़ पावसाळ्यात त्यावर पाणी पडल्यास इतर आठ महिने त्याला सुकवून वेळावेळी त्याची विक्री करता येणे शक्य होत़े माती आणि काडीकचरा एकत्र झाल्यास शेतकरीच खरेदीदाराला टोपल्यामागे 20 रुपयांर्पयतची सूट देतात़ परंतू मातीतच हे खत टाकले जाणार असल्याने खरेदीदार शेतकरी 20 रुपयांर्पयतची सूट नाकारतात़ सातपुडय़ाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जनवारांना दरदिवशी 8 ते 12 किलो चारा सहज मिळत असल्याने त्यांचे शेणखत हे सेंद्रीय खत म्हणून चांगले मानले जात़े