शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय महामंडळांची कर्ज माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 11:35 IST

समाज प्रबोधन संवाद यात्रा : लक्ष्मणराव ढोबळे यांची मागणी

ठळक मुद्दे 52 जातींना सवलतींबाबत काहीच माहिती नाही राज्यभरात एकटय़ा मातंग समाजात 300 संघटना आहेत. दलित समाजातील प्रमुख पाच पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. अनुसूचित जातीच्या 59 जातीमधील 52 उपेक्षीत जाती अशा आहेत की त्यांना सवलती कशाशी खातात हे माहितीसु

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागासवर्गीय महामंडळाची कर्जे माफ करावी व अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतर} पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी समाज प्रबोधनासाठी राज्यभर संवाद यात्रा काढली आहे. त्याअंतर्गत ते शनिवारी नंदुरबारात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना ढोबळे यांनी सांगितले, शेतक:यांचे हजारो कोटींचे कर्ज माफ होते. परंतु जो शेतात राबतो. कष्ट करतो त्या उपेक्षीतांचे कर्ज माफ करण्याबाबत सरकार काहीही हालचाल करीत नाही. राज्यातील सर्वच मागासवर्गीय महामंडळांची कज्रे माफ करून या उपेक्षीत घटकाला दिलासा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात आली आहे. यासाठी कुठलेही आंदोलन केले जाणार नाही. सनदशीर मार्गाने मागणी लावून धरली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मातंग समाजासह मागासवर्गीयांसाठी अण्णाभाऊ साठे यांनी काम केले. या वंचीत घटकांची अंत्यप्रेरणा जागृत करण्याचे काम केले. आपल्या साहित्यातून त्यांनी जागृती केली अशा या महान व्यक्तीला त्यांचा कार्याचा गौरव म्हणून भारत रत्न जाहीर करावा अशी मागणी देखील त्यांनी केली.समाजातील वंचीत घटकांनी मुख्य प्रवाहात यावे यासाठी विविध माध्यमातून प्रय} केले जात आहेत. त्यासाठीच प्रबोधन संवाद यात्रा देखील काढण्यात आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जावून आपण आर्थिक, शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन करीत आहोत. काटकसरीने 50 ते 100 रुपये बचत करून बँकांचे खाते जिवंत ठेवा, सैनिक, पोलीस भरती यासाठी समाजातील तरुणांनी तयारी करावी. आरोग्य, शिक्षण व बचतगट यामध्ये पुढाकार घ्यावा. आपली मुलं मिरवणुकीने पहिलीच्या शाळेत घालावी यासाठी आग्रही राहावे असे प्रबोधन या माध्यमातून करण्यात येत आहे. 1 ऑगस्टपासून वाटेगावहून ही यात्रा सुरू करण्यात आली असून 31 ऑगस्ट रोजी मुंबई चिरागनगर येथे तिचा समारोप होणार असल्याचेही लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.