शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर : तळोदा पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:04 IST

तीन कोटी रुपये खर्च, खत निर्मितीही होणार

तळोदा : नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास शासनाने मंजुरी दिली असून त्यासाठी साधारण पाऊणे तीन कोटी रुपयेदेखील उपलब्ध करुन दिले आहेत. प्रकल्प सुरू करण्यासाठी पालिकेनेही टेंडरची प्रक्रिया हाती घेतल्यामुळे लवकरच कामही सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे कचरा डेपोतील सततच्या दरुगधीने आजूबाजूच्या रहिवाशांना यातून सुटका होणार आहे.शहरातील कचरा संकलनासाठी येथील नगरपालिकेने नजीकच्या चिनोदा रस्त्यावर 2005 मध्ये कचरा डेपो उभारला होता. यासाठी पालिकेने स्वत:ची साधारण अडीच एक जागा वापरली आहे. तथापि, या कचरा डेपोत शहरातील कच:याबरोबरच गटारींचा गाळ पालिका तेथे टाकत असल्यामुळे आजूबाजूच्या वसाहतींमधील रहिवाशांबरोबरच पादचा:यांनाही सतत दरुगधीचा त्रास सहन करावा लागत असे. साहजिकच यामुळे पालिकेने आपला हा कचरा डेपो इतरत्र हलवावा, अशी मागणी पालिकेकडे केली जात होती. शिवाय या कचरा डेपोमुळे त्याला लागून असलेल्या जमिनीची एन.ए. (बिनशेती) प्रक्रियाही थांबली होती. परिणामी शहरीकरणाची गती मंदावली होती. त्यातही तेथील प्लास्टीक पिशव्यांचा कचरा हवेमुळे आजूबाजूच्या वसाहतींमध्ये सतत उडत असल्यामुळे रहिवासी प्रचंड वैतागले होते. मेलेली जनावरे तेथेच टाकली जात होती. त्याच्या दरुगधीनेही नागरिक वैतागले होते. या पाश्र्वभूमीवर पालिकेने येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. साधारण दोन कोटी 89 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे जानेवारी 2019 मध्ये पाठविण्यात आला होता. याप्रकरणी पालिका प्रशासन आणि पदाधिका:यांनी मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील हायपॉवर कमिटीने तातडीने कार्यवाही करून या प्रकल्पास मान्यता दिली. त्याचबरोबर प्रकल्पासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार पालिकेनेही प्रकल्प उभारण्यासाठी टेंडरची प्रक्रिया राबवली असून लवकरच काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेने हाती घेतलेल्या या प्रकल्पामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून त्याच्या कामास तताडीने गती देऊन लवकर पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.