शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील दुर्गम भागात 400 ठिकाणी सौरपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:06 IST

दुर्गम भाग : पाणी टंचाईवर उपाययोजना

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : आदिवासी दुर्गम भागात जेथे वीज पोहचली नाही किंवा नळ पाणीपुरवठा योजना नाहीत अशा गाव पाडय़ांवर 400 ठिकाणी सौरपंपद्वारे पाणी पुरवठा अर्थात सौर उर्जेवर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात येणार आहे. त्यातील काही ठिकाणी कामेही सुरू झाली आहेत.सातपुडय़ातील दुर्गम भागात भौगोलिक परिस्थितीमुळे नळ पाणीपुरवठा करता येत नाही. परिणामी अशा गाव, पाडय़ातील नागरिकांना झरे किंवा नदीचे पाणी प्यावे लागते. टंचाई कृती आराखडय़ात देखील अशा ठिकाणी उपाययोजना करणे म्हणजे मोठे जिकरीचे काम ठरते. यंदाच्या टंचाई आराखडय़ात धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील गावांची संख्या कमी असली तरी त्या भागात आतापासूनच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने यापूर्वी मंजुर केलेल्या सौर पंपांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ठिकाणी ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे.वाहन जाण्यास अडचणीसातपुडय़ातील अनेक गाव व पाडे ही उंचावर तर काही ठिकाणी तीव्र उतारावर आहेत. परिणामी अशा गाव, पाडय़ांमध्ये कुपनलिका खोदाईचे वाहन जाण्याची मोठी कसरत असते. ही बाब लक्षात घेता गाव, पाडय़ाच्या मोक्याच्या जागेवर कुपनलिका घ्यावी लागते. जेणेकरून दोन, तीन पाडय़ांना ती मध्यवर्ती ठिकाणी व सोयीचे ठरते. अशा ठिकाणी हातपंप बसविला जातो किंवा त्यावर वीजपंप बसवून पाणीपुरवठा केला जातो. परंतु खोदाईची मर्यादा असल्यामुळे अशा कुपनलिकांमधील पाणी पातळी लवकर कमी होते. 400 सौरपंपजिल्ह्यातील अतिदुर्गम भागात पाण्यासाठी 280 दुहेरी सौरपंप आदिवासी विभागाकडून व 100 राष्ट्रीय जलयुक्त अभियानाकडून मिळाले की ते या ठिकाणी अर्थात जेथे पाणी लागेल तेथे ते बसविण्यात येऊन तेथील जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय काही ठिकाणी विविध योजनांद्वारे देखील असे पंप बसविले जाणार आहे. नुकतेच भगदरी ग्रामपंचायतअंतर्गत खडकापाणी, पाडवीपाडा, मोजापाडा, उंबराबारीपाडा, हि:याबारीपाडा, खुंटबार, लकडाई, डोंगरफळी, निकपाणी, गव्हाणीचापाडा या ठिकाणी सौर उज्रेवर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली असून त्यासाठी 36 लाख 50 हजार 130 रुपये खर्च अपेक्षीत आहे.