नंदुरबार : पशुचिकित्सा दवाखान्यातील सोलर सिस्टीमच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा येथे घडली. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाण्याविहीर येथे पशुचिकित्सा दवाखाना आहे. या ठिकाणी सौर सिस्टीम लावण्यात आली आहे. चोरट्यांनी १६ ते १९ जानेवारीदरम्यान संपूर्ण सौर उपकरणेच चोरून नेली. त्यात १२ हजार रुपये किमतीची सौर बॅटरी, चार हजार रुपये किमतीची सौर प्लेट असे एकूण १६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेलेे. सोमवारी दवाखाना उघडण्यासाठी कर्मचारी गेले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर अक्कलकुवा पोलिसांना कळविण्यात आले.
याबाबत पशुचिकित्सा अधिकारी साना उदेसिंग भोसले यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार रूपाली महाजन करीत आहे.