शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल मिडियाचे वेड लागल्याने तरुण पिढी भरकटत चालली आहे. समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे. संस्कारशील युवकच राष्ट्र घडवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत पद्मभूषण श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी सोमवारी येथे केले.खेतिया (मध्य प्रदेश) येथे सत्संगानिमित्त आलेल्या पद्मभूषण विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, समाज, युवापिढीकडून राष्ट्राला काय मिळेल ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण तरुणांना काय देतो हे महत्त्वाचे आहे. हल्लीच्या तरुणांना जसे ज्ञान दिले त्याचा परिपाक भविष्यात पाहायला मिळेल. यासाठी प्रथमत: वेबसिरीज यासारखे साईड बंद झाले पाहिजे. सध्याच्या तरुणांचा त्याच्यावरच भर आहे. यासंबंधी राज्यसभेत पिटीशन दाखल केले होते. सर्व स्तरातील नेत्यांची भेट घेऊन योग्य निकाल देण्याचीही मागणी केली होती.शिक्षणाबाबत बोलताना महाराज म्हणाले की, शिक्षणाने पिढी तयार होते. भविष्याची वाटचाल मिळते. कॅरेक्टर नाही. हल्ली गावातील अशिक्षित माणूस एवढ्या चुका करत नाही त्याउपरही सुशिक्षित माणूस चुका करून बसत आहे. त्यामुळे सुशिक्षितपणाचा आव आणण्यापेक्षा मनापासून परिवर्तन करा. सर्वांशी प्रेमाने वागा सदाचार घडवा. सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये सहावीच्या पुस्तकात थोडाफार अश्लील विषय होता तो निघावा यासाठी पिटीशन दाखल केले आणि तो विषयही काढला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लहान वयात योग्य संस्कार पडणे गरजेचे आहे. विविध वेबसाईट यांना भेट देऊन विद्यार्थी नको ती माहिती घेतात, आवश्यक तेवढीच माहिती घेतली पाहिजे. सेक्स एज्युकेशन हा शिक्षणाचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत मीडियाबाबत बोलताना ते म्हणाले की, टीआरपी वाढवण्यासाठी सगळीकडे स्पर्धा सुरू आहे. चांगली बातमी देण्यात कोणीही आग्रही नाही ही आजची परिस्थिती व दहा वर्षापूर्वीची परिस्थिती यातही विसंगतपणा आढळतो. संस्कारितपणा हळूहळू लोप पावत चालला आहे. विविध जाहिरातींच्या माध्यमातून संस्कारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियानेही अधिकाधिक चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हैदराबाद घटनेबाबत बोलताना महाराज म्हणाले की, घटना घडली याचा विचार केला पाहिजे. अश्शील चित्रपट बंद केले पाहिजे. नाहीतर देशात अशा घटना घडत राहतील, असे त्यांनी सांगितले.श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजांचे आजपर्यंत ‘दो कदम विस्मरण से स्मरण की और’ हे पुस्तक दहा भाषेत प्रसिद्ध आहे. हे पुस्तक वाचून ४०० मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमातून परत आणले. जोपर्यंत स्वत:मध्ये बदल होत नाही तोपर्यंत देश बदलणे शक्य नाही. कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. समाजात चांगले संस्कार देण्याचे कार्य आम्ही करत असतो. समाजाने अधिकाधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.