शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

अनिष्ट व खर्चिक चालीरितींना हद्दपारसाठी समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समाजाच्या विकासासाठी अनिष्ट चालीरितींना फाटा देत  समाज बांधवांनी स्वत:पासून बदल करण्याची गरज असल्याचा सूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समाजाच्या विकासासाठी अनिष्ट चालीरितींना फाटा देत  समाज बांधवांनी स्वत:पासून बदल करण्याची गरज असल्याचा सूर येथे मंगळवारी झालेल्या मराठा समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनात व्यक्त झाला. महाअधिवेशनात समाजातील समस्यांवर चर्चा होऊन त्यावर काय उपाययोजना होऊ शकतात याबाबत मान्यवरांनी मते व्यक्त केली.मराठा समाज परिवर्तन चळवळ, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळ,  मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ, क्षत्रिय मराठा समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मराठा समाज प्रबोधन मंडळ, मराठा समाज महिला प्रबोधन मंडळ, मराठा समाज पंचमढी मंडळ व मराठा युवा मंच नंदुरबार जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाचे अध्यक्ष अशोकराव गुंजाळ होते. महाअधिवेशनाचे उद्घाटन आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, दीपप्रज्वलन व ध्वजारोहणाने अधिवेशनाला  सुरुवात झाली.  या वेळी मुंबई येथील अॅड.अभिजित पाटील, आरक्षण समितीचे राज्य समन्वयक संतोषराव साळुके, अहमदाबाद येथील उद्योजक प्रवीण नवले, ज्येष्ठ समाजसेवक भटूआप्पा वाघारे, आरक्षण समितीचे खान्देश विभाग अध्यक्ष श्यामभाऊ जाधव, जळगाव मराठा उद्योजक विकास मंडळाचे अध्यक्ष आनंदराव चौथे, अ.भा. सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष सोमनाथ मराठे,  बोईसर येथील उद्योजक व पत्रकार विठोबा मराठे,  सुरत येथील क्षत्रिय मराठा कल्याण ट्रस्टचे संस्थापक मनोज पवार, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष  राजेश जाधव, जळगाव येथील मराठा उद्योजक विकास मंडळाचे संचालक डॉ.धनंजय बेंद्रे, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाच्या सल्लागार डॉ.विजया गायकवाड, चाळीसगाव येथील शाहू मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा आरस्ता माळतकर, अलकनंदा भवर, आरक्षण समितीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विश्वासराव मराठे, सुरत मराठा कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.सी.डी. शिंदे, मराठा समाज मंगल कार्यालय समिती जळगावचे अध्यक्ष विष्णू बाळदे, बाळासाहेब मोङो, तुकाराम पिंजन, शालिग्राम मते, मराठा पंचमढी नंदुरबारचे अध्यक्ष श्रावण मराठे यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातील मराठा समाजाच्या विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी आमदार डॉ.तांबे म्हणाले की, समाजाच्या विकासासाठी समाज बांधवांनी चिंतन करून बदल स्वीकारणे गरजेचे आहे. त्याची सुरुवात स्वत:पासून करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबई येथील अॅड.अभिजित पाटील यांनी मराठा आरक्षण मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या न्यायालयीन लढाईची माहिती दिली. अशोकराव गुंजाळ म्हणाले की, क्षत्रिय मराठा सेवा महामंडळाकडून समाज विकासाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तिन्ही राज्यात विविध समितींचे गठन करून त्यांच्याद्वारे कार्यक्रम घेण्यात येतील, असे सांगितले. मनोज पवार, सोमनाथ मराठे, राजेश जाधव, प्रवीण नवले, प्रा.ज्ञानेश्वर सोनवणे, जिजाबराव पवार, अलकनंदा भवर, आरस्ता माळतकर, प्रा.हिरामण मते, राजू मोरे, प्रा.किरण काळे, तुकाराम पिंजन, बाबूराव ढवळे, राजेंद्र जाधव आदींनी  समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करणे, शैक्षणिक विकास, तरुणांच्या विवाहविषयक समस्या, नोकरी-रोजगाराची समस्या आदींबाबत मनोगत व्यक्त केले. तरुण -तरुणींमधील मोबाईल व सोशल मिडियाच्या अतिवापराबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. उल्लेखनीय कामगिरीकरणा:यांचा गौरवया महाअधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा:या समाज बांधवांचाही गौरव करण्यात आला. त्यात शेती क्षेत्रातील काशीनाथ मिरघे, भटू बोराणे, पुरुषोत्तम चव्हाण, अंबालाल नवले, राजेंद्र बो:हाडे, किशोर साळुंके, भगवान मोगल, दिगंबर चव्हाण, रोहिदास मराठे, बारकू बोराणे,   शांतीलाल गायकवाड, पंडित पवार. पत्रकारिता क्षेत्रातील नीलेश पवार, लक्ष्मण कदम, ईश्वर पाचोरे,    सुधाकर मराठे, वसंत कदम, गणेश मराठे, सुरेश पवार, हिरालाल मराठे आदींचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट भजनी मंडळ म्हणून उमर्दे, काकर्दे व शिरुड येथील भजनी मंडळाच्या कलावंतांना तर आदर्श गाव म्हणून दहिंदुले, धमडाई, रांझणी, प्रतापपूर, असलोद या गावांना गौरविण्यात आले.प्रास्ताविकातून क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीचे संस्थापक विठ्ठल मराठे यांनी महाअधिवेशन घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला.  सूत्रसंचालन किरण दाभाडे, धनराज मराठे व  नंदराव कोते यांनी तर आभार शरद चव्हाण यांनी मानले.