लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : बामखेडातर्फे त:हाडी, ता.शहादा येथील एकता चौक मंडळाने सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. गेल्या 12 वर्षापासून अखंड रक्तदान शिबिर घेऊन हजारो पिशव्या रक्त संकलित केले. यंदा शिबिराचे 13 वर्षे होते. त्यात 170 पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या.बामखेडातर्फे त:हाडी येथील एकता चौक मित्र मंडळ व धुळे येथील नवजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सप्ताहाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या वेळी माजी प्राचार्य आर.एम. चौधरी, माजी सरपंच शिवदास चौधरी, पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी, सहायक परिवहन अधिकारी विजय चौधरी, माजी प्राचार्य पी.सी. पटेल, माजी प्राचार्य व्ही.आर. पटेल, प्राचार्य एस.एस. चौधरी, नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ.सुनील चौधरी, एकता चौक मित्र मंडळाचे सदस्य, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.येथील 13 तरुणांनी 2004 मध्ये एकत्रित येऊन एकता मंडळ स्थापन केले. ग्रामस्थांच्या मदतीने अखंड 12 वर्षे भागवत कथेचे आयोजन केले होते. 13 युवकांमधून काही जण बाहेरगावी असल्याने त्यांना उपक्रमात सहभागी होण्यात अडचण येत असल्याने त्यातील नरेंद्र पाटील, अरुण पटेल, अमोल पटेल, नरेंद्र पटेल, श्रीकांत पटेल, सुहास चौधरी, रवींद्र पटेल, देवेंद्र पटेल, रवींद्र पाटील आदी नऊ तरुणांनी आपली परंपरा ग्रामस्थांच्या सहकार्याने कायम ठेवली. रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासली. 13 भागवत कथा पूर्ण झाल्या. परंतु सामाजिक कार्य पुढे नेण्याचा संकल्प करीत रक्तदान शिबिर ग्रामस्थांच्या मदतीने दरवर्षी दिवाळीदरम्यान आयोजित करीत आहेत. यावर्षी 170 जणांनी रक्तदान केले. या वेळी धुळे येथील नवजीवन रक्तपेढीचे डॉ.सुनील पाटील, दिलीप जाधव, चंद्रकांत धनगव्हाळ, सुभाष खैरनार, चंद्रकांत राजपूत, जुनेद शेख, पांडुरंग गवळी, जयपाल गिरासे, मयुरी देशमुख आदींनी रक्तसंकलन केले.या वेळी गावातील तरुण विजय चौधरी यांची प्रथमच स्पर्धा परीक्षा देऊन नाशिक येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहायक परिवहन अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने तसेच महेंद्र पटेल यांनी 85 वेळा रक्तदान केल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबिरांतून जपली सामाजिक बांधीलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:19 IST