शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तथाकथित महाराजामुळे तोरणमाळची शांतता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 12:10 IST

गोरक्षनाथ मंदिरावर दावा : ग्रामस्थांची तक्रार, पोलीस अधीक्षकांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तोरणमाळ येथील गोरक्षनाथ मंदिर व मंदिराच्या संपत्तीवर मालकी हक्काचा दावा सांगणा:या तथाकथीत महाराजामुळे तोरणमाळ येथील शांतता धोक्यात आली आहे. मंदिराची तोडफोड झाल्याचा कांगावा करणा:या या महाराजाच्या कृत्यामुळे त्यात भर पडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी तोरणमाळ येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या वेळी ग्रामस्थांनी या महाराजाची चौकशी करून त्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली.तोरणमाळ येथे गोरक्षनाथांचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची देखभाल व सेवा अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ करतात. मंदिराच्या ट्रस्टची नोंददेखील आहे. मात्र त्याबाबत न्यायालयीन वाद आहे. एक ते दीड वर्षापासून अचानक एका तथाकथीत महाराजाने या मंदिरात आपले बस्तान मांडले आहे. तो कुठून आला, कशासाठी आला याबाबत कोडे ग्रामस्थांनाही उलगडलेले नाही. तो मंदिर व त्याची संपत्तीचा मालक असल्याचे सांगून ग्रामस्थांना धमकावत आहे. या तथाकथीत महाराजामुळे तोरणमाळ येथे अनेकदा लहान-मोठे वादही उद्भवले असल्याने येथील शांतता धोक्यात आली आहे. ग्रामस्थांनी त्याच्याविरोधात म्हसावद पोलिसांत तक्रारही दिली आहे. तरीही या महाराजाचे उपद्व्याप सुरूच आहेत. अज्ञात लोकांनी मंदिराची तोडफोड केल्याची तक्रार ‘त्या’ महाराजाने पोलिसांत केल्याने वादात अधिकच भर पडली आहे. मात्र मंदिर तोडून नवीन बांधण्याचे आमिष दाखवून त्यानेच मंदिराची तोडफोड केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.या घटनेची जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दखल घेत तोरणमाळ येथे भेट देऊन माहिती घेतली. मंदिर परिसराचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थ व त्या महाराजाची बैठक घेतली. बैठकीत पोलीस पाटील ओलसिंग नाईक, जीवन रावताळे, करमसिंग चौधरी, सुशांत चव्हाण, हेमराज तडवी, दिलीप रावताळे, विक्की चव्हाण, सुरेश नाईक, पहाडसिंग नाईक, विजय रावताळे यांच्यासह सुमारे 150 ग्रामस्थांनी तथाकथित महाराजामुळे उद्भवत असलेल्या तक्रारींचा पाढा वाचला. एक-दीड वर्षापूर्वी तो येथे कुठून व कशासाठी आला त्याची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई करावी व तोरणमाळ येथून त्याची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली. अन्यथा कुठलाही अनर्थ घडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. बैठकीचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात आले असून या तथाकथीत महाराजाविरोधात ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे.