शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा सुळी येथे रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यात कृषी पंपाचा वीजपुरवठा पूर्ण दाबाने व सुरळीत अखंडितपणे करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून कारवाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यात कृषी पंपाचा वीजपुरवठा पूर्ण दाबाने व सुरळीत अखंडितपणे करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून कारवाई होत नसल्याने तालुक्यातील सुळी येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको केले. येत्या चार दिवसात विद्युत खांब उभे करून समस्येचे समाधान करू, असे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता सुधीर माळी व तहसीलदार नवापूर यांना करंजी बुद्रुक, सोनखडका, कुंकरान, मोहनपाडा, पिंपरान, भोमदीपाडा, बोरपाडा, पाटीबेडकी, कामोद, खोकसा, कोटखाम, चिचलीपाडा आदी गावातील शेतक-यांनी वेळोवेळी निवेदन देऊन व तोंडी पाठपुरावा करून कृषीपंपाना होत असलेला कमी दाबाच्या व अनियमित विद्युत पुरवठ्याबाबत तक्रारी करून या समस्या सोडविण्याची मागणी केली होती. विद्युत वितरण कंपनी जाणून-बुजून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप झाला होता. रोपण भात, कापूस व ऊसाला त्याची झळ बसून नुकसान होत असल्याचे लक्षात आणून देण्यात आले होते. वडखुट येथील फिडर ५० वर्ष जुना व सर्वाधिक विद्युत जोडण्या असलेला फीडर आहे. वारंवार वडखुट फिडर ब्रेकडाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना कायमसाठी विजेचा प्रश्न निर्माण झाला होता. पाटीबेडकी येथे ३३ के.व्ही. केंद्र मंजूर असूनही त्याचे कार्य सुरु होत नसल्याने समस्यांमधे वाढच होत आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सुळी येथील चार रस्त्यावर शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी पं.स. सदस्य राजेश गावीत, सरपंच जालमसिंग गावीत, करंजी बुद्रुकचे माजी सरपंच आलू गावीत, नारायण गावीत, जैकु गावीत, नवग्या गावीत, सुभाष वळवी, पंतु गावीत, गंगाराम गावीत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. जोपर्यंत वडखुट फिडर क्षेत्रतील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरुन उठणार नाहीत अशी भूमिका घेत वीज अभियंता गोरकर यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन पोहोचल्यानंतर त्यांनी शेतकरी व विज अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. विज अभियंता यांनी चार दिवसात विद्युत खांब टाकून काम पूर्ण करु, असे आश्वसन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.यावेळी पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन, हे.कॉ.गुमान पाडवी, प्रविण मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.