शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

नंदुरबारातील सराफा दुकान फोडणारा आठ तासात ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 16:43 IST

नंदुरबार : सराफा बाजारातील ज्वेलरीचे दुकान फोडून अडीच लाखांचा ऐवज चोरून नेणा:या चोरटय़ास अवघ्या आठ तासांच्या आत अटक करण्यात ...

नंदुरबार : सराफा बाजारातील ज्वेलरीचे दुकान फोडून अडीच लाखांचा ऐवज चोरून नेणा:या चोरटय़ास अवघ्या आठ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झालेला चोरटय़ाला लागलीच पोलिसांनी ओळखल्याने चोरी करून घरी येवून आरामात झोपलेल्या चोरटय़ाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरम्यान, याच चोरटय़ाने जवळच  असलेले हॅण्डलूमचे दुकान देखील फोडले होते.संतोष दिलीप तिजवीज (32) रा.बाहेरपुरा, नंदुरबार असे चोरटय़ाचे नाव आहे. नंदुरबारातील सराफा बाजारातील भर रस्त्यावरील व फडके पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेले साई-श्रद्धा ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकवून चोरटय़ाने दुकानात प्रवेश केला. दुकानातील काऊंटरवर असलेले सुमारे दोन लाख 42 हजार 745 रुपयांचे दागीने त्याने चोरून नेले. दुकानातील तिजोरी फोडण्याचाही त्याने प्रय} केला परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे मोठी रक्कम वाचली. त्यानंतर चोरटा तेथून पसार झाला. सकाळी सहा वाजता दुकानाच्या शेजारी राहणा:यांच्या लक्षात चोरीची बाब लक्षात आल्यावर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक गिरीश पाटील, शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक सुभाष भोये घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही तपासाबाबत मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकात गवळी यांनी माहिती घेवून पथकाला काही सुचना केल्या.याच चोरटय़ाने जवळच असलेल्या नॅशनल हॅण्डलूम दुकानाचे कुलूप तोडून त्यातून देखील त्याने शाल चोरल्याचे सांगितले. दुकानात रोख रक्कम न मिळाल्याने त्याने थंडीपासून बचावासाठी शाल घेवून ज्वेलरीचे दुकान फोडले. तेथे देखील पोलिसांनी तपास केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस ठाण्याचे गिरीश पाटील, वाहतूक शाखेचे सुभाष भोये, हवालदार रामा वळवी, अरुण सैंदाणे, योगेश लोंढे, विजय ढिवरे, लक्ष्मीकांत निकुंभ, शैलेश गावीत, विकास पाटील, राकेश मोरे यांनी केली. दरम्यान, सराफा बाजारातील अनेक दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे त्याचा  चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे बाजारातील इतर दुकानादारांनी देखील आपल्या दुकानात आणि  बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे      असे आवाहन शहर पोलीस     निरिक्षक गिरीश पाटील यांनी केले आहे. दुकानाच्या समोरच असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले असता पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास डोक्यात टोपी घातलेला आणि अंगावर शाल पांघरलेला व्यक्ती या दुकानाच्या परिसरातून दोन ते तीन वेळा ये-जा करतांना आढळून आला. त्याचे बारकाईने निरिक्षण केले असता गुन्हे शोध पथकाचा पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष तिजवीज याच्यावर संशय आला. लागलीच त्याच्या घरी जावून त्याला ताब्यात घेतले. त्याने चोरी करतांना घातलेले कपडे अंगावरच होते. त्यामुळे त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढून लागलीच सीसीटीव्ही फुटेज तपासाण्या कर्मचा:यांना पाठविण्यात आला. पडताळणी केला असता संतोषच असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पथकाने पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली. परंतु उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. शिवाय चोरीतील दोन लाख 42 हजार रुपयांचे दागीने देखील काढून दिले. संपुर्ण दागीने एका कापडात गुंडाळून त्याने घरी ठेवले होते. ते सर्व जसेच्या तसे काढून दिले. सराफा व्यावसायिक यांनी देखील ते ओळखले.