शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार अंगणवाडींना स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:33 IST

दुर्गम भागात कनेक्टिव्हिटीची राहील अडचण

नंदुरबार : जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी कर्मचारींना स्मार्ट फोन दिला जाणार असून त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल हा आॅनलाईन भरावा लागणार आहे. यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसिकरण याची माहिती तात्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे. दरम्यान, ग्रामिण भागात कनेक्टिीव्हिटीची समस्या लक्षात घेता हा प्रयोग किती आणि कसा यशस्वी होतो याकडेही लक्ष लागून आहे.सर्वच क्षेत्रात आॅनलाईन कामकाजाची सुरुवात झाली आहे. पूर्वी संगणकावर काम करून त्याचा ई-मेल पाठवून आॅनलाईन काम केले जात होते. परंतु आता संगणक आणि लॅपटॉपवरून थेट मोबाईलवर आॅनलाईन कामकाज आले आहे. त्यात आता अंगणवाडी देखील सुटलेल्या नाहीत. त्यामुळे अंगणवाडी बाईला आता स्मार्टफोन हातात घेवून कामकाज करावे लागणार आहे. जिल्ह्यात लवकरच असे स्मार्ट फोन वाटप केले जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागातर्फे देण्यात आली.अडीच हजार अंगणवाडीजिल्ह्यात जवळपास दोन हजार ४४० अंगणवाडी आहेत. अनेक अंगणवाडी या दुर्गम भागात भरत असतात. काही ठिकाणी इमारत नसल्यामुळे कुडाच्या घरात किंवा अंगणवाडी सेविकेच्या अंगणात अथवा ग्रामपंचायत कार्यालयात त्या भरवाव्या लागतात. यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असते. यामुळे पुरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे यासह इतर बाबींना अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागते.अहवाल देण्याची कसरतअंगणवाडी सेविकांना गरोदर माता, बालकांचे वजन, लसिकरण, पुरक आहार यासह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल त्यांना केंद्र किंवा तालुकास्तरावर द्यावा लागत असतो. त्यासाठी संबधीत ठिकाणी जावे लागते. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमतरता लक्षात घेता असे अहवाल वेळेत सादर करण्याची मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागते. आधीच कमी मानधन त्यात असा अवांतर खर्च त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक फरफट देखील होत असते.आता स्मार्ट फोनअंगणवाडी सेविकांना आता स्मार्ट फोन दिले जाणार आहेत. प्रत्येक अंगणवाडीला एक असे एकुण दोन हजार ४४० स्मार्ट फोन पुरविण्यात येतील. त्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने मोबाईल अ‍ॅप विकसीत केले आहे. रजिस्टरऐवजी आता या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन मध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जातील. परिणामी रजिस्टरवरील दैनंदिन नोंदीचे काम संपुष्टात येणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांनाही दिलासा मिळणार आहे.लवकरात लवकर स्मार्ट फोन कसे उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापुराव भवाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी विनोद वळवी यांनी सांगितले.