शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

खावटी अनुदान वाटपाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे आदिवासी मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने अत्यंत गरीब आदिवासींना खावटी अनुदान योजना ...

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे आदिवासी मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्य शासनाने अत्यंत गरीब आदिवासींना खावटी अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल दीड-दोन वर्षांनंतर का असेना आता या योजनेचा प्रत्यक्ष लाभ आदिवासींना दिला जात आहे. या योजनेत तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील तळोदासह अक्कलकुवा व धडगाव अशा तीन तालुक्यातील ८४ हजार १६७ लाभार्थींचे अर्ज कर्मचाऱ्यांनी भरून घेतले होते. हे सर्व प्रस्ताव येथील प्रकल्प कार्यालयाने पडताळणी केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी नाशिक आदिवासी विकास विभाग यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते. तेथून साधारण ८२ हजार प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिक आदिवासी विकास विभागाकडून प्रत्यक्ष लाभार्थींच्या बँक खात्यात थेट एकूण अनुदानापैकी दोन हजार रुपये टाकले जात असून, आतापावेतो १५ हजार लाभार्थींच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तीन-चार दिवसात सर्व लाभार्थींच्या खात्यावर रक्कम टाकली जाणार असल्याची माहिती देण्यात आली असली तरी रक्कम टाकण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. कारण ८२ हजारांपेक्षा अधिक लाभार्थींचे अर्ज मंजूर झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी १५ हजार लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. अजून ६७ आजार लाभार्थी शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यावर रक्कम टाकायला किती वेळ लागेल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या कोरोना महामारीच्या भीतीमुळे मजूर कामाला यायला तयार नाही. रोजगार हमीची कामे सुरू असली तरी पैसे वेळेवर मिळत नसल्याने या कामांकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे. अशा विदारक परिस्थितीत त्यांना खावटी अनुदानाची अत्यंत गरज आहे. मात्र तीही वेळेवर मिळत नसल्यामुळे लाभार्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आधीच कोरोनाने बाधित झालेल्या कुटुंबांना आपल्या नातेवाइकांच्या उपचारासाठी पैसे उपलब्ध व्हावे म्हणून घरातील सोने-चांदीच्या वस्तू मोडाव्या लागल्या होत्या. या पैशातून त्यांनी आपल्या घरातील बाधिताचा कसाबसा उपचार केला. आता पैशांची तीव्र अडचण भासत असल्याची व्यथा काहींनी बोलून दाखवली आहे. निदान आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उर्वरित लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी अधिक गती द्यावी, अशी लाभार्थींची मागणी आहे.

लाभार्थी मारताहेत प्रकल्पात हेलपाटे

खावटी अनुदान योजनेचे अर्ज भरून सहा सात महिने उलटूनही अजूनपावेतो त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. साहजिकच पैशांच्या अडचणीमुळे हे लाभार्थी ग्रामीण भागातून तळोदा प्रकल्पात रोजच हेलपाटे मारत आहेत. परंतु वरूनच अनुदान आले नसल्याचे सांगण्यात येते. योजना जाहीर होऊन व पात्र लाभार्थींचे अर्ज भरून चार-पाच महिने झाले आहेत. त्यामुळे त्यांचा संयमाचा अंत न पाहता शासनाने लवकर कार्यवाही करणे अपेक्षित असताना त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात असल्याने लाभार्थींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाची विदारक परिस्थिती लक्षात घेऊन आमचा अंत पाहू नये, अशी त्यांची अपेक्षा आहे.

खावटीचे धान्य कधी देणार

खावटी अनुदानात चार हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी सध्या दोन हजार रुपयांचे वाटप केले जात आहे. उर्वरित धान्याचे किट कधी देणार आहेत, असा सवाल लाभार्थींनी उपस्थित केला आहे. कारण प्रशासकीय पातळीवर निविदा अर्थात टेंडरिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात काय स्थिती आहेत याची कल्पना अजून समोर आलेली नाही. खावटी अनुदानाचा मूळ हेतू कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरजू लाभार्थींना आर्थिक आधार देण्याचा होता. मात्र अशा परिस्थितीत त्यांना अजूनही शासनाचा आर्थिक आधार होत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीत आम्हा गरीब कुटुंबांना आर्थिक मदत होण्यासाठी खावटी अनुदान योजना मंजूर केली आहे. परंतु अजून तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. सध्या कोरोना महामारीमुळे रोजगारदेखील नाही. निदान या योजनेसाठी ठोस कार्यवाही करावी.

-अभिमन्यू सोनवणे, लाभार्थी, अमोनी, ता.तळोदा

कोरोनाकाळात ज्या घटकांना शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला होता, अशा इतरांना लाभ देण्यात आला आहे. केवळ आदिवासी लाभार्थी अजून खावटी अनुदानापासून वंचित आहेत. आदिवासी विकास विभागाने दोन हजार रुपयांचे अनुदान वाटप करण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी अजूनपावेतो १५ हजार लाभार्थींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. इतरांना केव्हा मिळेल याबाबत संबंधित प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी.

-अमृतासिंग पावरा, सामाजिक कार्यकर्ता, धवळीविहीर, ता.तळोदा

तळोदा आदिवासी विकास प्रकल्पाकडे आलेले पात्र लाभार्थींचे सर्व अर्ज आदिवासी विकास विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केले आहे. त्यांनी मंजूर करून अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा केली जात आहे. युद्धपातळीवर काम सुरू असल्यामुळे दोन-तीन दिवसात सर्वच लाभार्थींच्या खात्यावर रक्कम जमा होईल.

-अमोल मेटकर, प्रभारी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा