लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सासू व सुनेला मारहाण करणा:या सहा जणांना शहादा न्यायालयाने प्रत्येकी सात हजार रुपयांचा दंड ठोठावला.या खटल्याच संक्षीप्त हकीकत अशी, पुसनद येथील आनुबाई भु:या भिल यांची सून भारतीबाई ही ओटा सारवन करीत असतांना शेजारी राहणारा बुधू दुल्लभ भिल याने वाद घातला. बुधू सह विजयाबाई भिल, सुदाम भिल, अभिमन भिल, शत्रुघA भिल, बच्चू सोनवणे यांनी एकत्र येत आनुबाई व भारतीबाई यांना बेदम मारहाण केली. सहाही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सुधीर मोरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.आर.कल्हापूरे यांच्या कोर्टात या खटल्याची सुनावनी झाली. न्यायालयाने बुधू भिल, विजयाभाई भिल, अभिमन भिल, सुदाम भिल, शत्रुघA भिल, बच्चू सोनवणे या सर्वाना प्रत्येकी सात हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षातर्फे अॅड.संजय चौधरी यांनी काम पाहिले.
मारहाण प्रकरणी सहा जणांना न्यायालयाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:42 IST