शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घराबाहेर झोपलेल्या दोघांच्या नाकात गुंगीचे औषध टाकून सहा लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील महात्मा गांधी नगरात घराबाहेर झोपलेल्या माय-लेकराच्या नाकात गुंगीचे औषध टाकून घरातील सहा लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील महात्मा गांधी नगरात घराबाहेर झोपलेल्या माय-लेकराच्या नाकात गुंगीचे औषध टाकून घरातील सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली़ घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  महात्मा गांधी नगरातील प्लॉट क्रमांक 120 मध्ये राहणारे वृत्तपत्र विक्रेते जगदीश नथू चौधरी व त्यांच्या आई राधाबाई घराच्या मुख्य दारासमोर झोपले होत़े दरम्यान मंगळवारी पहाटे 1 वाजेदरम्यान अज्ञात चोरटय़ांनी दोघांच्या नाकात गुंगीचे औषध टाकून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ चोरटय़ांनी लाईट लावून घरातील लोखंडी कपाट तोडून आतील लॉकरमध्ये ठवेलेले दोन लाख रुपये रोख आणि सोन्या चांदीचे चार लाख रुपये किमतीचे दागिने असा सहा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला़ पहाटे चार वाजता चौधरी यांना जाग आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला़ आत जाऊन खात्री केली असता कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचे त्यांना दिसून आल़े त्यांनी तातडीने पोलीसांना कळवल्यानंतर घटना उजेडात आली़पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर बडगूजर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जलाल शेख यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेची माहिती शहरात वा:यासारखी पसरल्यानंतर वृत्तपत्र विक्रेते चौधरी यांच्याकडे गर्दी जमा झाली होती़ दरम्यान पोलीसांनी श्वानपथकास पाचारण केले होत़े महात्मा गांधी नगरातील माध्यमिक शाळेर्पयत श्वानाने माग काढला़  दरम्यान दोन दिवसापूर्वीच महात्मा गांधी नगर भागात असलेल्या पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद मोहन चौधरी यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला होता़ चोरटय़ांनी इन्व्हर्टरची बॅटरी चोरुन नेली होती़ याबाबत अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

चौधरी यांच्या घरातून चोरटय़ांनी लांबवलेले दागिने त्यांच्या बहिणीचे असल्याची माहिती आह़े रायगड येथे राहणा:या जगदीश चौधरी यांच्या बहिणीने घर बदल करण्याचे काम सुरु असल्याने दागिने भावाकडे ठेवण्यासाठी दिले होत़े यादरम्यान ही चोरी झाल्याने हळहळ व्यक्त होत होती़ चौधरी कुटूंबियांच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होत़े