लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यात अज्ञात माथेफिरुकडून शेतातील पिकांचा आग लावण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत़ तालुक्यातील मोड येथील आष्टे शिवारात शनिवारी रात्री 9 वाजता माथेफिरुकडून आग लावण्यात आली़ त्यामुळे शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़ेआष्टे शिवारातील तापीबाई चौधरी यांच्या शेतातील उसाला रात्री नऊच्या सुमारास अज्ञाताकडून आग लावण्यात आली़ आगीचे लोण पाहता परिसरातील ग्रामस्थांमध्ये एकच घबराट पसरली होती़ या आगीत सुमारे सात एकराहून अधिक क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला असल्याची माहिती देण्यात आली़ याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलींद वाघमारे करीत आह़े दरम्यान या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ चांगलेच घाबरले आहेत़
सहा एकर ऊस आगीत खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 11:08 IST