शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या छतावर बसून प्रवास करणे बेतले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 12:02 IST

बालिकेचा मृत्यू : ऊसतोड करुन परतणाऱ्या कुटंबावर ओढवला प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिकअप वाहनाच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या बालिकेला झाडाची फांदी लागल्याने दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला़ ही घटना सुरवाणी ता़ धडगाव गावाजवळ ८ मार्च रोजी घडली होती़पिंकी उर्फ अश्विनी ओल्या वसावे (१३) असे मयत बालिकेचे नाव आहे़ पिंपळखुटा ता़ अक्कलकुवा येथील ओल्याा पारशी वसावे हे कुटूंबासह पाच महिन्यांपूर्वी पंढरपूर जि़ सोलापूर येथील साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेले होते़ साखर हंगाम आटोपल्याने ते ७ मार्च रोजी एमएच १३-४२१३ या पिकअप वाहनाने मजूरांच्या टोळीसोबत घराकडे परत निघाले होते़ मजल दर मजल करत ते ८ मार्च रोजी धडगाव तालुक्यातील सुरवाणी गावापर्यंत आले असता, वाहनाच्या टपावर सामान धरुन बसलेल्या अश्विनी हिला झाडाच्या फांदी फटका बसला यात ती वाहनातून थेट रस्त्यावर आदळली़ गंभीर दुखापत झाल्याने तिला तात्त्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ याठिकाणी उपचारादरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने तिला तातडीने नंदुरबार जिल्हा सामान्या रुग्णालयात हलवण्यात आले होते़ परंतू उपचार सुरु असताना अश्विनी हीचा मृत्यू झाला़या अपघातानंतर वाहनचालक हा वाहन घटनास्थळी सोडून पळून गेला होता़ याप्रकरणी ओल्या वसावे यांंनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक करत आहेत़