शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

डामरखेडा व शिरुड दिगरला साध्या पद्धतीने विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या नियमांचे पालन करीत तालुक्यातील डामरखेडा व शिरुड दिगर येथे दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या नियमांचे पालन करीत तालुक्यातील डामरखेडा व शिरुड दिगर येथे दोन शेतकरी कुटुंबातील विवाह साध्या पद्धतीने पार पडले.शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील स्वातंत्र्य सैनिक कै.रामजी पुरुषोत्तम पाटील यांची नात व कै.चंद्रशेखर यांची कन्या चि.सौ.कां.मेघा हिचा विवाह मोहिदेतर्फे हवेली, ता.शहादा येथील मनोहर सखाराम पटेल यांचे पुत्र चि.गौरव यांच्यासोबत दोन महिन्यापूर्वी निश्चित करण्यात आला होता.दुसरा विवाह सोहळा डामरखेडा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन शंकर लक्ष्मण पाटील यांचा पुतण्या चि.भावेश अनिल पाटील याचा विवाह शिरूड दिगर, ता.शहादा येथील गोविंद भिला पाटील यांची कन्या चि.सौ.कां.मनिषा यांच्यासोबत ठरला होता. विवाह ठरलेल्या वधू-वरांच्या कुटुंबांकडून तयारी झाली होती. मात्र कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासह शासनाने दिलेले नियम पाळून हे दोघेही विवाह अत्यंत साध्या पध्दतीने घरगुती वातावरणात पार पडले. मेघा व गौरव यांचा विवाह डामरखेडा येथे तर भावेश व मनिषा यांचा विवाह शिरूड दिगर येथे पार पडला.