शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्य संघटनेतर्फे मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:36 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा :  शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा ...

  लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा :  शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे संस्थापक अध्यक्ष तथा  एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी  व विविध आदिवासी बांधव समाज सेवा संघटनांनी  सोमवारी सारंगखेडा येथे पीडितेच्या घरापर्यंत शांततेत मूकमोर्चा काढत पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात आली.प्रेमसंबंधाच्या नकारावरुन एका अल्पवयीन मुलीची २३ ऑक्टोबरला मध्यरात्री निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना सारंगखेडा येथे घडली होती. याप्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून ठिकठिकाणी संघटनांकडून निषेध नोंदविण्यात येत आहेत.  या युवतीच्या खूनप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवाजी ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला. हा मूकमोर्चा तापी पुलापासून थेट बाजारपेठ, ग्रामपंचायत चौकमार्गे पीडित कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची  भेट घेऊन सांत्वन करण्यात येऊन आपल्या कुटुंबियांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल याबाबत चर्चा करण्यात आली. ते म्हणाले, ही केस अति जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी,  अशी मागणी  या वेळी करण्यात आली. पुन्हा मोर्चे व आंदोलने सुरू राहतील, असा इशारा शिवाजीराव ढवळे यांनी दिला. नंतर सारंगखेडा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी  येऊन तपासकामी चर्चा करण्यात आली आली.या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत गुमने, पोलीस निरीक्षक नंदावळकर, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ, पोलीस निरीक्षक भगवान कोळी, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस उपनिरिक्षक देविदास सोनवणे आदी उपस्थित  होते.

सारंगखेड्याला आले पोलीस छावणीचे स्वरूपसारंगखेडा येथे पंधरा वर्षीय युवतीचा निर्घुण खून झाल्यानंतर त्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी सारंगखेडा येथे गेल्या १५ दिवसापासून मोर्चे, आंदोलने, मूकमोर्चे, नेते मंडळींची पीडित कुटुंबीयांना सात्वनपर भेटी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबियांच्या घरासह गावात पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याने सारंगखेडा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावात अनुचित प्रकार होणार नाही म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असून वेळोवेळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी आठवडाभरापासून आठ पोलीस अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदींचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.