शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

आजाराने मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : सातत्याने झालेल्या पावसाचा केवळ शेती व शेतक:यांनाच नव्हे तर मेंडी पालनावरही झाला आहे. नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : सातत्याने झालेल्या पावसाचा केवळ शेती व शेतक:यांनाच नव्हे तर मेंडी पालनावरही झाला आहे. नंदुरबार शनिमांडळसह तालुक्याच्या पूर्वेकडील अन्य गावांमध्ये दीड महिन्यांपासून मेंडय़ांवर सततच्या पावसामुळे रोगराई निर्माण झाली असून ब:याच मेंडय़ा दगावल्या आहे. तर आजही रोगग्रस्त मेंडय़ा दगावण्याचे सत्र सुरुच असल्याचे बलवंड येथील मेंडपाळांकडून सागण्यात आले.यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी व नंतरही सुरुच राहिलेल्या पावसामुळे अवघा जिल्हा धास्तावला गेला. पिकांचे मोठे नुकसान              झाल्याने श्ेतक:यांसमोर मोठे संकट निर्माण झाले. त्याशिवाय या पावसामुळे जिल्ह्यातील पशुधनही प्रभावित झाले. त्यात पावसाच्या दृष्टीने संवेदनशिल असलेल्या मेंडय़ांवर अधिक परिणाम झाला आहे. नंदुरबार तालुक्याच्या पूर्वेकडील शनिमांडळ, रजाळे, बलवंड यासह अन्य गावांमध्ये मेंडीपालन व्यवसायाचे प्रमाण अधिक असून तेथील  मेंडय़ा यंदाच्या पावसामुळे संकटात सापडल्या आहे. मेंडय़ांच्या अंगावरील लोकर ओले होऊन, खुरीला माती लागून मेंडय़ावर अनेक आजार   निर्माण झाल्याचे आढळून आले आहेत. त्याशिवाय सततच्या पावसामुळेच मेंडय़ांना दिला जाणारा चारा ओला होऊन काळा पडला आहे. मेंडपाळांना कुठलाही पर्याय नसल्यामुळे काही प्रमाणात तसाच चारा दिला गेल्यामुळे मेंडय़ांचे आरोग्य अधिकच संवेदनशिल झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागील दीड महिन्यांपासून मेंडय़ांवर निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या आजारांमुळे अनेक  मेंडय़ा दगावल्याचे मेंडपाळांकडून सांगण्यात आले. शनिमांडळ, रजाळे व बलवंड या भागात मेंडय़ा मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यात बलवंड येथील तुकाराम ठेलारी, खेमा ठेलारी, दिमाबाई ठेलारी, भगत हरी ठेलारी, बबलू ठेलारी, दादा लखन ठेलारी, ताना ठेलारी, रघुनाथ ठेलारी, नाना खंडू ठेलारी, भावडा ठेलारी, पांडा ठेलारी, आना खंडू ठेलारी, जना ठेलारी, दशरथ ठेलारी, रामा ठेलारी, मसाबाई ठेलारी सुका ठेलारी यांच्या मेंडय़ा दगावल्याचे सांगत मेंडपाळांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे देखील सांगण्यात आले. जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत रोगराई पसरलेल्या मेंडय़ांवर उपचार करण्यात आला असूनही अनेक मेंडय़ा वाचल्या नसल्याचे मेंडपाळांमार्फत सांगण्यात येत आहे. शिवाय शेकडो मेंडय़ा दगावल्यानंतरही मेंडय़ांचे मृत्यूसत्र सुरूच असल्याचे असल्याची व्यथा बलवंड येथील मेंडपाळांमार्फत मांडण्यात येत आहे. आजाराचे निदान करण्यासाठी दगावलेल्या मेंडय़ांचे शवविच्छदन करतांनाच काही नमुने देखील घेण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले आहे.