शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात 11 जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 12:01 IST

कांचमाळी समाज पंच मंडळ : आठव्या सामूहिक विवाह समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

तळोदा : येथील कांचमाळी समाज पंच मंडळातर्फे आठवा सामुदायिक विवाह सोहळा रविवारी समाजाच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वेळी 11 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. याप्रसंगी वधू-वरांकडील व:हाडींनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली       होती.श्री समस्त कांचमाळी समाजातर्फे रविवारी येथील माळी समाज मंगलकार्यालयात हा सामूदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर खासदार हिना गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, माजीमंत्री अॅड.पद्माकर वळवी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य भरत माळी, नगराध्यक्ष अजय परदेशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, पालिकेचे प्रतोद संजय माळी, पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण माळी, देवमोगरा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार, चुणिलाल सूर्यवंशी, नारायण माळी, नीळकंठ महाजन, बांधकाम              सभापती भास्कर मराठे, पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, नगरसेवक गौरव वाणी, सुभाष        चौधरी, योगेश पाडवी, जितेंद्र सूर्यवंशी, सतिवान पाडवी, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, योगेश मराठे, प्रसाद सराफ, कॉलेज ट्रस्टचे  उपाध्यक्ष प्रा.सुधीर माळी, पंच मंडळाचे अध्यक्ष ईश्वर मगरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी समाजातील 11 वधू-वरांचे शुभमंगल लावण्यात आले. या वेळी खासदार हिना गावीत यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाजामध्ये सामुदायिक विवाह मोठय़ा प्रमाणात झाले पाहिजे. ज्यामुळे मोठा अनावश्यक खर्च टळत असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन                पंच मंडळाचे सचिव प्रा.मित्तल           टवाळे व प्राचार्य अजित टवाळे यांनी केले.कार्यक्रमास वधू-वरांकडील व:हाडी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पंच मंडळाचे उपाध्यक्ष विनायक माळी, मधुकर मगरे, गिरधर सागर, उखा पिंपरे, अरविंद मगरे, भिका मगरे, विजय              शेंडे, अनिल मगरे, लक्ष्मण सागर, मोहन सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, राजाराम राणे, जयेंद्र सूर्यवंशी, वतनकुमार मगरे, भगवान मगरे, हिरालाल कर्णकार, महेश माळी, भगवान कर्णकार, भानुदास                 राजकुळे, पंकज राणे, सुनील सूर्यवंशी, आंबालाल चव्हाण, शशिकांत सूर्यवंशी, पंकज शेंडे, महिला मंडळाच्या अध्यक्षा लतिका मगरे, मनिषा प्रविण मगरे, जयश्री राजेंद्र   मगरे आदींसह समाजातील              युवकांच्या विविध मंडळांनी परिश्रम घेतले  होते.