या वेळी मारुती मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करून तसेच समर्पण निधीच्या पावती पुस्तकासह आरती करण्यात आली. ब्राह्मणपुरी येथील युवराज दत्तात्रय पाटील यांनी श्रीराम मंदिर निर्माणसाठी ५१ हजार १११ रुपयांच्या निधीचा धनादेश दिला. तसेच नीलकंठ बधू पाटील, सुभाष गर्वधर मराठे, राजाराम उखा पाटील, नारायण पहाडा पाटील, युवराज रोहिदास पाटील, रामदास लक्ष्मण पाटील, आंबालाल नीलकंठ पाटील, निंबा नामदेव पाटील, संतोष पाटील, उपसरपंच माधव पाहाडा पाटील, निंबा काशीराम मराठे यांनीही देणगी दिली. हा निधी ब्राह्मणपुरीचे समन्वयक युवराज पाटील, राजाराम पाटील, ईश्वर पाटील, मनोज निकम, निंबा मराठे, राधेश्याम कुलथे, लखन सोनार, रावसाहेब निकम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी नीलकंठ पाटील, सुभाष मराठे, ईश्वर पाटील, निंबा कचवे, प्रवीण पाटील, कैलास पाटील, मनोज पाटील, रावसाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्राह्मणपुरीत श्रीराम मंदिर निधी संकलनास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST