शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दहिंदुल येथे दु:खातून सावरण्यासाठी केले श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 13:15 IST

बांधला बंधारा : दहिंदुले येथील कुटुंबाचा आदर्श उपक्रम

वसंत मराठे । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : मयताचे दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम संपल्यानंतर 12 दिवस दुखवटा पाळणा:या त्या कुटुंबाला दु:खातून सावरण्यासाठी बाहेर काढून नेण्याची प्रथा मराठा समाजात आहे. या खर्चिक व निरुपयोगी प्रथेस फाटा देऊन दहिंदुले, ता.नंदुरबार येथील काळे कुटुंबाने आपले नातेवाईक अन् गावक:यांसह गावाजवळील एका शेतात जाऊन तेथे शंभर ते दीडशे मीटरचा मातीचा बांध श्रमदातून बांधला. विशेष म्हणजे श्रमदानात महिलाही सहभागी झाल्या होत्या. मराठा समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या या अनिष्ट प्रथेस प्रथमच काळे परिवाराने आळा घातल्याने या कुटुंबाचे कौतुक केले जात असून, इतरांनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा समाजाने व्यक्त केली आहे.अत्यंत रूढीप्रिय समाज म्हणून जिल्ह्यातील मराठा समाज ओळखला जात असतो. समाजातील या अनिष्ट रुढी नष्ट करण्यासाठी समाजाच्या सामाजिक संघटनादेखील सातत्याने प्रय} करीत आहे. त्यात काही अत्यंत खर्चिक रुढींवर व्यसन घालण्यातही संघटनांना यश आले आहे. तथापि अजूनही काही खर्चिक रुढी समाजात आजही सुरू आहेत. समाजातील मयत व्यक्तीचा दशक्रिया विधी व उत्तर कार्याचा कार्यक्रम संपल्यानंतर गेली 12 दिवस दुखवटा पाळणा:या संपूर्ण कुटुंबास त्यांचे जवळचे नातेवाईक बाहेर नेत असतात. अर्थात यामागे दु:खी कुटुंब आपले दु:ख विसरून पुन्हा त्यांचे खंडित कामकाज सुरळीत करावे असा हेतू असतो. मात्र या प्रथेमुळे नातेवाईकांचाही वेळ व पैसा जात असतो. साहजिकच ही प्रथा खर्चिक अन् निरूपयोगी ठरत आहे. परंतु समाजात ती आजही वर्षानुवर्षे सुरू आहे.समाजातील हा अनिष्ट पायंडा नंदुरबार तालुक्यातील काळे परिवाराने मोडला आहे. त्यांच्या कुटुंबातील तोताराम लकडू काळे यांच्या प}ी भागाबाई तोताराम काळे यांचे निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम मंगळवारी पार पाडला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर मयताच्या कुटुंबाला बाहेर काढून नेण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक थांबले होते. या वेळी घरातीलच गावाचे उपसरपंच दीपक काळे            यांनी बाहेर नंदुरबारला न जाता         गावात वॉटर कप स्पर्धे अंतर्गत सुरू असलेल्या कामावर श्रमदान  करण्याची कल्पना घरातील बुजूर्ग व्यक्तींपुढे मांडली. या व्यक्तींनी कुठलेही फाटे न फोडता तत्काळ होकार दिला. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब आपल्या नातेवाईकांसह गावाजवळीलच वसंत माळी यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी शंभर ते दीडशे मीटरचा मातीबांध श्रमदानातून बांधला. जवळपास सायंकाळपावेतो कुटुंबाने श्रमदान केले होते. विशेष म्हणजे कुटुंबासोबत महिलांनी सुद्धा श्रमदान केले. या वेळी प्रा.पांडुरंग गायकवाड, बलराम कुसारे,  काशीनाथ कदम, प्रवीण कदम, भटू शेळके, दीपक माळी, मयूर माळी, कैलास माळी, जगन्नाथ न्हावी,    योगेश कदम, सुनील आहेर आदींसह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित        होते.